Hanuman Jayanti 2023 Shubh Muhurat in Marathi: हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सव हा मोठ्या थाट्यामाट्या साजरा केला जातो. संकटमोचन हनुमानजींच्या भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. पवनपुत्र हनुमानजी यांची जयंती ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. त्यामुळे आज चैत्र पौर्णिमेचा दिवशी देशभरात बजरंगबलीची जयंती साजरी केली जाते आहे. (hanuman jayanti 2023 hanuman janmotsav 2023 date puja shubh muhurat significance tithi holiday panchang in marathi)
अशा परिस्थितीत हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हनुमान जयंती शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.
पूजा चौकी, लाल वस्त्र, लाल लंगोट, पंचामृत, पाण्याचा कलश, जनेयू, सिंदूर, चमेलीचे तेल, गंगाजल, चांदी/सोन्याचे काम, अक्षत, चंदन, गुलाबाच्या फुलांच्या माळा, अत्तर, भाजलेले हरभरे, गूळ, नारळ, केळी, चुरमा, बनारसी पान, दिवा, अगरबत्ती, अगरबत्ती, कापूर, मोहरीचे तेल, तूप, तुळशीची पाने.
- ओम श्री हनुमते नम:
- ओम अंजनेय विद्महे वायुपुत्रय धीमहि । तन्नो हनुमत प्रचोदयात् ।
- मनोजवम मारुत्तुल्यवेगम जितेंद्रियम् बुद्धिमतम ज्येष्ठ. वातात्माजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ॥
- 'ओम नमो भगवते हनुमते नमः'.
- 'ओम नमो हरि मरकत मरकतय स्वाहा।'
राम भक्तांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप खास असतो. श्री रामाचा भक्त हनुमानजींच्या जयंतीला विधीवत पूजा केली जाते. शहर, गाव्यात मोठ्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात असा विश्वास आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन म्हटलं जातं.
असं म्हणतात की, जो भक्त हनुमानजीची उपासना करतात ते भय, क्रोध, दु:ख, दोष मुक्त होतो. हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा केली की आपल्याला दुहेरी म्हणजे रामाची आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. एक असं ही मान्यता आहे, म्हणजे शिवपुराणात असं म्हटलं आहे की, संकटमोचन हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे.
धार्मिक ग्रंथानुसार, शनिदेवाने हनुमानजींना वरदान दिले होते की जो बजरंगबलीची पूजा करतो त्याला त्रास देणार नाही. म्हणून जर तुमच्यावर शनि आणि धैय्याचा अशुभ प्रभाव असेल आणि तो टाळायचा असेल तर हनुमान जयंतीला ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. बजरंगबलीला सिंदूर रंगाचा लंगोट, लाल फूल, सुपारी आणि गूळ-चोरा अर्पण करा. नंतर कच्च्या खोबरेल तेलाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानजीची आरती करा. असं केल्यामुळे शनीच्या महादशापासून सुटका मिळते.