Guru Vakri 2023: गुरु ग्रहाची वक्री चाल वाढवणार चिंता; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार वादळ

Guru Vakri 2023 : गुरू ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी बदलतात. आगामी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4.58 वाजता गुरू मेष राशीत वक्री होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 5, 2023, 10:43 AM IST
Guru Vakri 2023: गुरु ग्रहाची वक्री चाल वाढवणार चिंता; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार वादळ title=

Guru Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, गुरूला विशेष महत्त्व देण्यात आलं असून हा ग्रह देवांचा गुरु मानला जातो. ज्यावेळी गुरू ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी बदलतात. त्याचप्रमाणे गुरू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे 13 महिने लागतात. 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 22 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे. आगामी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4.58 वाजता गुरू मेष राशीत वक्री होणार आहे. बृहस्पतिच्या वक्री हालचालीमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

या राशीमध्ये गुरू बाराव्या घरात वक्री असणार आहे. शुक्र आणि गुरू यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी वक्री बृहस्पति चांगला सिद्ध होणार नाही. या काळात घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विचार पुढे ढकलेला बरा. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात.

मिथुन रास

मेष राशीतील गुरू वक्रीचा या राशीच्या अकराव्या घरात असेल. या राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते. यासोबतच कामाच्या ठिकाणी थोडे सावधगिरी बाळगा.  कोणताही निर्णय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. एखाद्या सहकाऱ्याशी गैरसमज झाल्यामुळे खूप वाद होऊ शकतात. आर्थिक क्षेत्रातही विशेष काळजी घ्या.

कन्या रास

या राशीमध्ये गुरु वक्री होऊन आठव्या भावात राहणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नुकसान होऊ शकते. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

वृश्चिक रास

या राशीमध्ये गुरू मेष राशीत वक्री असेल आणि सहाव्या घरात असेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात समस्या येतील. विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जीवनातील अडचणी वाढू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. खर्च वाढल्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )