Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला 3 शुभ योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ

Guru Purnima 2023 Date : आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदाची गुरु पौर्णिमा अतिशय खास आहे. यादिवशी तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jun 25, 2023, 11:23 AM IST
Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला 3 शुभ योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ title=
guru purnima 2023 auspicious yoga these zodiac signs will luck

Guru Purnima 2023 Date :  गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:  

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यादिवशी शिष्य त्यांना भेटवस्तू देतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा व्यतीरिक्त आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेद व्यास जयंती या नावानेदेखील ओळखलं जातं. गुरु हा आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक असतो. त्याचा प्रती आभार मान्यचा हा दिवस.

गुरु पौर्णिमा ही वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. कुंडलीतील बृहस्पति उच्च आणि मजबूत स्थितीत असेल तर तुम्हाला आयुष्यात यश, प्रगती आणि कीर्ती लाभते. त्यामुळे कुंडलीतील गुरु बलवान करण्यासाठी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूची पूजा कराला हवी असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.  (guru purnima 2023 auspicious yoga these zodiac signs will luck )

गुरु पौर्णिमा 2023 कधी आहे?

पंचांगानुसार या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार 3 जुलै 2023 ला साजरी करण्यात येणार आहे. 

गुरु पौर्णिमा 2023 शुभ योग

यंदाची गुरु पौर्णिमा अतिशय खास आहे. यादिवशी ब्रह्मयोग, इंद्र योग आणि बुधादित्य राजयोग जुळून आले आहेत. या शुभ योगांमध्ये गुरूंची दीक्षा घेणं अतिशय शुभ मानलं जातं. 

ब्रह्मयोग - 02 जुलै 2023 संध्याकाळी 07.26 वाजेपासून 03 जुलै 202 दुपारी 03.45 वाजेपर्यंत 
इंद्र योग - 03 जुलै 2023 दुपारी 03.45 वाजेपासून 04 जुलै 2023 सकाळी 11.50 वाजेपर्यंत 

गुरु पौर्णिमेला गुरु दीक्षा कशी घ्यावी ? 

गुरु दीक्षेच्या वेळी गुरुने तुमच्या कानात सांगितलेलं गुरु मंत्र नियमितपणे 5 किंवा 11 वेळा त्याचा जप करा. 

जर तुम्ही कोणाला अध्यात्मिक गुरू बनवले नसेल, म्हणजेच जर तुम्ही कोणाकडून गुरु दीक्षा, मंत्र घेतला नसेल, तर भगवान विष्णूंला गुरू मानून त्यांची पूजा करा. 

गुरुपौर्णिमेला गुरु दोषावर उपाय (guru dosh upay)

कुंडलीतील बृहस्पति दोषमुक्तीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून गुरु ग्रह ओम बृं बृहस्पतये नमः  या मंत्राचा नियमित जप करा. 

पिवळे वस्त्र, हरभरा डाळ, हळद, सोने, केशर, पितळेची भांडी इत्यादी एखाद्या गरीब आणि गरजू ब्राह्मणाला दान करा. 

'या' राशींना होणार लाभ

सिंह (Leo)

गुरुपौर्णिमेला या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. रखडलेल्या कामं सहज मार्गी लागणार आहेत. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळेल. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे अनेक मार्ग मिळतील.कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. हा दिवस गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. 

मिथुन (Gemini)

गुरु पौर्णिमा या राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगती घेऊन येणार आहे. आर्थिक लाभासह यशाचं शिखर ही लोक गाठणार आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)