Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान होणार आहे. गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून 

नेहा चौधरी | Updated: Sep 20, 2023, 04:16 PM IST
Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व title=
gauri puja 2023 date 21st septembe vidhi muhurta timing and importance ritual of jyeshtha gauri avahana video and Ganeshotsva

Gauri Pujan 2023 : पंचांगानुसार गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी आवाहन केलं जातं. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं आगमन 21 सप्टेंबरला गुरुवारी होणार आहे. गौरी म्हणजे माता पार्वती आणि तर बहीण लक्ष्मी माता दोघी माहेरी येतात. असं म्हणतात की, गणोबाचं पाहुणचार नीट सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी माता गौराई येते. म्हणून माहेरी आलेल्या गौराईच्या पूजनात मोठा थाट माट पाहिला मिळतो. गौराई सप्तमीला येते आणि अष्टमीला पाहुणचार घेते आणि नवमीला ती तृप्त होऊन स्वगृही परत जाते. (gauri puja 2023 date 21st septembe vidhi muhurta timing and importance ritual of jyeshtha gauri avahana video and Ganeshotsva)

संपूरण महाराष्ट्रात गौराईचा उत्साह पाहिला मिळतो. खरं तर प्रांत बदलाला की रीतीरिवाज बदलतात. तसंच या गौराईचं पण आहे. 

भाद्रपद सप्तमी तिथी : गुरुवार, 21 सप्टेंबर 2023 ला दुपारी 2 वाजून 16 मिनिटे पासून शुक्रवार 22 सप्टेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 34 वाजेपर्यंत 

ज्येष्ठागौरी आवाहन मुहूर्त : गुरुवार, 21 सप्टेंबर 2023 ला दुपारी 3 वाजून 35 मिनिटापर्यंत करावे. 

गौरी आवाहन - 21 सप्टेंबर 2023

परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचा पाय दुध, पाण्याने धुवावे आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढा. घरच्या उंबऱ्यावर आत येताना पाच धान्याचे स्टीलचे ग्लास भरून ठेवा आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढा. यानंतर शंख वाजवून गौरीचं घरात आगमन करा. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना करा. 

यानंतर गौरीचं स्थापना करा. म्हणजे गौरीला साडी, दागिने घालून सजवा आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचं नैवेद्य दाखवला जातो. 

गौरी पूजन  22 सप्टेंबर 2023

दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं. गौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणाचार. पंचांगानुसार दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य देखील प्रांतनुसार वेगवेगळा असतो. पण साधणार यात पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्याची पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात.  

सायंकाळी हळदी, कुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो. महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि प्रियजनांना जेवण्यासाठी निमंत्रण दिलं जातं. 

गौरी विसर्जन 22 सप्टेंबर 2023

तिसऱ्या दिवशी पाच दिवसांच्या गणपतीसोबत गौराईचं विसर्जन होतं. या दिवशी सकाळी सुतात हळदी, कुंकू, बेल फळ, झेंडूची पानं, झेंडूची फुलं, काशी भोपळा फूल, रेशमी धागा यांचं प्रत्येकी एक एक गाठ बांधून ओटी तयार केली जाते. यानंतर ही ओटीच्या समोर किंवा डोक्यावर ठेवा नंतर आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखविला जातो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)