Mars Transit in Socorpio : 16 नोव्हेंबर रोजी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सकाळी 10:46 वाजता मंगळ वृश्चिक राशीत गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरमुळे रुचकसह 4 राजयोग तयार झाले आहेत.
वृश्चिक राशीत मंगळाच्या आगमनाने आयुष्मान राजयोग तयार झाला आहे. त्याच वेळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि बुध आधीच या राशीत असल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झालाय. सूर्य आणि मंगळ वृश्चिक राशीत एकत्र असल्यामुळे आदित्य मंगल राजयोगही तयार झालाय. त्यामुळे मंगळाचे हे गोचर आणि राजयोगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर शुभ ठरणार आहे. या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. वाहन खरेदीसाठीही हा कालावधी योग्य ठरेल. करिअरसाठीही हा काळ चांगला परिणाम देणार आहे. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात खूप प्रगती कराल. या काळात तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता
मंगळाच्या या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांनी ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना आता लाभ मिळू शकतो. तुम्ही गुंतवणुकीची योजना बनवू शकता जी तुमच्यासाठी चांगली असेल. हे संक्रमण तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगले असणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिक बाबींच्या दृष्टीने फायदेशीर असेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर खूप अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसणार आहात. व्यवसायातही तुम्हाला लक्षणीय नफा मिळेल. मंगळाची ही स्थिती तुमच्या राशीसाठी खूप चांगली असणार आहे. नोकरीबरोबरच आर्थिक लाभासोबत व्यवसायातही अफाट यश मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर असे करणे फायदेशीर ठरू शकते.
मंगळाचे हे गोचर कन्या राशीच्या लोकांना धैर्य आणि आत्मविश्वास देणार असणार आहे. ग्रहांचा हा संयोग तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी खूप अनुकूल असणार आहे. तुमच्या लहान भावंडांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होणार आहेत. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमचे वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )