डिसेंबरमध्ये 5 ग्रह करणार गोचर; ग्रहांच्या स्थितीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ

December Grah Gochar 2023 :  डिसेंबरमध्ये बदलणाऱ्या ग्रहांच्या या हालचालीचा 2024 मध्ये सर्व राशींवर परिणाम होईल. 2024 मध्ये 4 राशींसाठी या ग्रहांची स्थिती थोडी त्रासदायक असेल. जाणून घेऊया डिसेंबरच्या ग्रह गोचरमुळे कोणच्या राशींच्या व्यक्तींना विपरीत परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Nov 30, 2023, 10:55 AM IST
डिसेंबरमध्ये 5 ग्रह करणार गोचर; ग्रहांच्या स्थितीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ  title=

December Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यानुसार दर महिन्यात काही ग्रह गोचर करतात. येत्या डिसेंबरमध्ये 5 ग्रह बदलणार आहेत. या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ हे राजा ग्रहांचे भ्रमण होणार आहे. 

गुरू हा मेष राशीत मार्गस्थ होणार आहे. तर सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहही धनु राशीत गोचर करणार आहे. त्याचबरोबर मंगळाचेही धनु राशीत भ्रमण होणार आहे. या महिन्यात धनु राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. धनु राशीमध्ये बुध आणि सूर्य एकत्र आल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. 

त्याचप्रमाणे धनु राशीत सूर्य आणि मंगळाच्या भ्रमणामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होणर आहे. गुरू 31 डिसेंबर रोजी मेष राशीत मार्गी होईल. डिसेंबरमध्ये बदलणाऱ्या ग्रहांच्या या हालचालीचा 2024 मध्ये सर्व राशींवर परिणाम होईल. 2024 मध्ये 4 राशींसाठी या ग्रहांची स्थिती थोडी त्रासदायक असेल. जाणून घेऊया डिसेंबरच्या ग्रह गोचरमुळे कोणच्या राशींच्या व्यक्तींना विपरीत परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.

कर्क रास

डिसेंबर महिन्यात सूर्यावर शनीची विशेष दृष्टी असणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकते. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची प्रकृतीही थोडी कमजोर राहू शकते. कुटुंबातही काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. या काळात उच्च प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संवाद वाढणार आहे.

कन्या रास

डिसेंबरमध्ये ग्रहांच्या गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात. घरगुती जीवनात काही प्रकरणांमुळे तणाव असू शकतो. आर्थिक गणित बिघडू शकते. मित्र किंवा जोडीदार फसवणूक करु शकतो. व्यवसायात तुम्हाला अनेक विवादित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक रास

डिसेंबरमध्ये होणार्‍या ग्रहांच्या गोचरमुळेमुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुमचे मन कोणत्याही कामात नीट एकाग्र होऊ शकणार नाही. तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचे शंभर टक्के देऊ शकणार नाही. कामाचा ताण जास्त असण्याची शक्यता असते. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताचा धोका आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक विरोधाभासी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. जर गूंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नुकसान होऊ शकते. पालकांशी काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. काही बाबींबाबत त्यांच्याशी वैचारिक मतभेदही असू शकतात. नवीन काम हाती घेण्याची शक्यतो टाळावे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )