Dhan Shakti Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलत असतो. ग्रहांच्या या स्थितीबदलाला गोचर असं म्हटलं जातं. या वर्षातील शेवटचा महिना डिसेंबरमध्ये अनेक ग्रहांचा संयोग असणार आगे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 25 डिसेंबरला वृश्चिक राशीत दुर्मिळ राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र आणि मंगळ यांच्या संयोगातून धन शक्ती राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना अपार संपत्तीचा लाभ होणार आहे. (end of the year 2023 Dhan Shakti Rajyoga Due to the planet Mars and Venus these zodiac signs will get immense wealth)
शुक्र हा मिथुन राशीच्या सहाव्या घरात असल्याने या राशींना अधिक लाभ होणार आहे. धनशक्ती राजयोगामुळे या लोकांना फायदा होणार आहे. कुटुंबातील कलहाची परिस्थिती संपुष्टात येणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. त्याशिवाय समाजात तुमच्या स्थान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा राजयोग उत्तम असणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत. कर्ज घेणे तुमच्यासाठी सोपं होणार आहे.
या राशीच्या चौथ्या घरात धन शक्ती योग निर्माण होणार आहे. हे स्थान जीवन, घर, मालमत्ता आणि वाहन इत्यादी मानलं जातं. यामुळे या राजयोगाचा मोठा लाभ या राशीच्या लोकांना होणार आहे. अनेक काळापासून रखडलेलं काम मार्गी लागणार आहे. भाऊ बहीणसोबतचा वेळ उत्तम जाणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. उच्च अधिकारी तुमच्या कामावर प्रसन्न होणार असून तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळणार आहे. वाहन, नवीन घर अगदी मालमत्ता खरेदीचे योग जुळून आले आहेत. व्यवसायिकांसाठीही हा राजयोग भरपूर नफा मिळवून देणार आहे.
या राजयोगाचा सर्वाधिक फायदा वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे. तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या आरोग्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या राजयोग अतिशय फायदेशीर ठरणार आङे. कोर्ट प्रकरणात तुम्हाला दिलासा मिळणार आहे. पालकांकडून तुम्हाला चांगल सहकार्य लाभणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)