Tirgrahi Yog : त्रिग्रही योगाच्या निर्मितीने चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध आणि सूर्याची राहणार कृपा

Tirgrahi Yog In Knaya : 1 ऑक्टोबरला बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 22, 2023, 04:05 PM IST
Tirgrahi Yog : त्रिग्रही योगाच्या निर्मितीने चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध आणि सूर्याची राहणार कृपा title=

Tirgrahi Yog In Knaya : ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अनेकदा या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. दरम्यान असाच एक त्रिग्रही आणि शुभ योग तयार होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो.

हा योग काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. 1 ऑक्टोबरला बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. दरम्यान 3 राशींच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत शुभ असणार आहे. जाणून घेऊया त्रिग्रही योग कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

त्रिग्रही योगाची निर्मिती या राशीच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण तुमच्या राशीच्या धन घरावर हा योग तयार होणार आहे. या काळात योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही नवीन लोकांशी संबंध निर्माण कराल. अडकलेला पैसा व्यावसायिकांकडून वसूल होऊ शकतो. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणतंही काम हातात घ्या त्यात तुम्हाला यश मिळणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग तयार होऊ शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीत तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळेल. हातातील कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. व्यापारी वर्गातील लोकांचे उत्पन्न वाढू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाची परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. तुमच्या कार्यस्थानावर त्रिग्रही योगाची दृष्टी पडतेय. त्यामुळे यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. रिअल इस्टेट, मालमत्ता किंवा मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमचे कोणत्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या जीवनात पैसा कमावण्याच्या अनेक संधी येतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )