मुंबई : दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या आधी लोकं मोठी खरेदी करतात. या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कधी-कधी लोकं चुकीच्या वस्तू देखील घरी घेऊन येतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
- जुन्या रिती-रिवाजा येणाऱ्या वेळेनुसार बदलत जातात. लोकं आता धनत्रयोदशीच्या दिवशी कार, इलेक्ट्रिक वस्तू देखील खरेदी करतात. पण या दिवशी इलेक्ट्रिक वस्तू नाही खरेदी केल्या पाहिजे. कारण एलईडी स्मार्ट टीव्हीमध्ये लक्ष्मीचा वास असतो का ? असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कदाचित नाही असेल. धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ असतं.
- भारतात लोकांना सोनं घालायला खूप आवडतें. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं सोनं खरेदी करणं पसंत करतात. चांदी खरेदी करणं देखील त्याला पर्याय असू शकतो.