Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा. 

Updated: Jan 7, 2023, 06:58 AM IST
Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान title=
Do not do these things after waking up in the morning otherwise there will be financial loss and Vastu Tips for Morning

Vastu Shashtra tips for morning : झोप छान झाली की सकाळी उठायला प्रसन्न वाटतं. आपली सकाळी ही छान आणि प्रसन्न व्हावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात. कोणी देवाचं नामस्मरण करतं, कोणी योगा तर कोणी बाहेर मार्निंग वॉकला जातं. आपण अनेकांनी हे वाक्य कधी ना कधी म्हटलं असेल किंवा ऐकलं असेलच की, सकाळी उठून कोणाचा चेहरा पाहिला की, आजचा दिवस इतक्या खराब गेला. आपण उठल्यानंतर पहिले कुठलं काम करतो त्यावर आपल्या दिवस ठरलेला असतो. वास्तूशास्त्रानुसार सकाळी उठून जर तुम्ही ही 4 कामं केल्यास तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येणार नाही. 

हे नक्की करा!

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम दोन्ही हात एकत्र पाहिले पाहिजे. असं म्हणतात तळहातावर देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचा वास असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर दोन्ही हात पाहून देवाचं स्मरण करा आणि नंतर हात चेहऱ्यावर फिरवा. 

त्याशिवाय सकाळी उठल्यानंतर सूर्याचं दर्शन घ्या. सकाळी उठल्या उठल्या सूर्याचं दर्शन घेणं हे शुभ मानलं जातं. काही जण सूर्योदयापूर्वीच उठतात अशा लोकांना दुहेरी शुभ योग लाभतो. त्यांना सूर्याच्या पहिले चंद्र दर्शन होतं. असं केल्या न होणारी कामं होतात आणि धनसंपत्तीचा लाभ होतो.

हे करु नका!

सकाळी उठल्यानंतर कधीही हिंसक प्राण्यांचे फोटो पाहू नये, शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. जर तुमच्या पलंगाच्या समोर असं चित्र असेल तर ते लगेचच काढून टाका. 

जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घाणेरडी भांडी साफ करण्यास सुरुवात केली, तर शरीरातील सकारात्मक उर्जेचा प्रवाह कमी होतो. त्याचबरोबर लक्ष्मीलाही यामुळे राग येतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी आणि स्वयंपाकघर दोन्ही गोष्टी स्वच्छ करून झोपा. सकाळी उठल्यानंतर कधीही खरखर्टी भांडी पाहू नका. (Do not do these things after waking up in the morning otherwise there will be financial loss and Vastu Tips for Morning)

सकाळी उठल्यावर दुसऱ्यांची सावलीकडे पाहू नये. विशेषतः सकाळी उठल्यानंतर कधीही पश्चिम दिशेकडे अजिबात पाहू नये. असं केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. असं म्हणतात की, सकाळी लवकर उठून आरशात बघू नये. सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहिल्याने नकारात्मकता येते आणि काम बिघडतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)