दिवाळी २०१७: स्वयंपाकघरातील या ५ वस्तू वापरून बनवा रांगोळी

दिवाळी हा सणच मूळात रंगबेरंगी आहे. या दिवसात नवे कपडे, आकाश कंदील, तोरणांचा झगमगाट आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी असते. 

Updated: Oct 11, 2017, 05:24 PM IST
दिवाळी २०१७: स्वयंपाकघरातील या ५ वस्तू वापरून बनवा रांगोळी title=

मुंबई : दिवाळी हा सणच मूळात रंगबेरंगी आहे. या दिवसात नवे कपडे, आकाश कंदील, तोरणांचा झगमगाट आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी असते. 
दिवाळीचा एक भाग आणि धार्मिक महत्त्व असल्याने शुभदिवशी घरासमोर रांगोळी काढली जाते. पण रांगोळी काढणं हीदेखील कला आहे. ती सार्‍यांनाच जमते असे नाही पण हौसेला काही मोल नाही. व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हांला रांगोळी काढण्याचा सराव नसेल आणि रांगोळी काढण्यासाठी आवश्यक साधनं तुमच्याकडे नसेल तर हिरमुसून जाण्याची गरज नाही कारण स्वयंपाकघरातील काही भांडी वापरूनदेखील तुम्ही सहज रांगोळी काढू शकता.  

थर्माकोलचे कप्स, फोक चमचे, गाळणी अशांचा वापर करून तुम्ही ही रांगोळी अवघ्या १० मिनटांमध्ये रांगोळी काढू शकता.