Horoscope 9 December 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं मार्गी लागू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

सुरभि जगदीश | Updated: Dec 9, 2023, 06:21 AM IST
Horoscope 9 December 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींची अडकलेली कामं मार्गी लागू शकतात! title=

Horoscope 9 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. व्यापाराच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी ऋतूबदलांमुळे होणाऱ्या आजारपणापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी काही अडचणींवर सहजपणे मात कराल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी विचाराधीन कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं चीज होईल. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी अडकलेले पैसे आणि अर्थार्जनाच्या नव्या संधी अगदी सहजपणे मिळतील. मनात कोणत्याही प्रकारचा संकोच ठेवू नका.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कामाचा व्याप वाढू शकतो. एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याची बेत आखाल.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. अडकलेली कामं मार्गी लागतील. आई- वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींनी घाईनं काम करु नका. काही मित्र गुपीतपणे तुमची मदत करतील. तुम्हाला जी आज अडचण वाटेल ती तुमच्यासाठी सकारात्मक बनेल. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे, चांगल्या लोकांची मदत मिळेल. तुमच्या हिंमतीच्या जोरावर समस्या सोडवाल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी नव्या जबाबदाऱ्या स्वीकाऱ्याव्या लागतील. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर तुमचे लक्ष असेल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी काही खास, महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी मेहनत कराल तेवढा नफा तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या वडीलधार्‍यांचा आदर करणं गरजेचं आहे.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी घरात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर काळजी घ्या. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )