आजचे राशिभविष्य | बुधवार | ६ फेब्रुवारी २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 6, 2019, 09:27 AM IST
आजचे राशिभविष्य | बुधवार | ६ फेब्रुवारी २०१९ title=

मेष- कामासोबतच काही जबाबदाऱ्या वाढतील. दिवस व्यग्र असेल. व्यापाराचे काही प्रश्न सोडवाल. बऱ्याच बाबतीत यसस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण शांत असेल. प्रवासयोग आहे. अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ- जुन्या अडचणी संपतील. स्वत:वर लक्ष द्या. समाज आणि कुटुंबात कामं पूर्णत्वास जातील. नव्या कल्पना सुचतील. मित्रांची मदत होईल. 

मिथुन- धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. अविवाहित लोकांना विवाहप्रस्ताव येतील. बुद्धीने स्वत:ची कामं पूर्णत्वास न्याल. शुभवार्ता कळेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. 

कर्क- अडकलेले पैसे परत मिळतील. अडचणींतून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत मिळेल. अडचणी लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यवहारचातुर्य आणि सहनशक्तीच्या बळावर कामं पूर्ण करा. 

सिंह- आर्थिक परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. अपेक्षांना वेसण घाला. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. कठिण कामंही तुम्ही मेहनत आणि सामंजस्याने पूर्ण कराल. 

कन्या- ऑफिस किंवा व्यापारत नवी सुरुवात कराल. सामात नवे प्रयोगही कराल. ज्या गोष्टींचा विचार कराल त्यात यशस्वी व्हाल. साथीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. दैनंदिन कामांमध्ये फायदा होईल. कौटुंबीक समस्या दूर होतील. 

तुळ- विचारात असणारी कामं पूर्ण कराल. फायदा होईल. कामाच नवे प्रयोही यशस्वी ठरतील. गुंतवणूकीचे बेत आखले जातील. उधार घेतलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. 

वृश्चिक- आजचा दिवस खास आहे. असे काही प्रसंग समोर येतील ज्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. समजुतदारपणाचा जास्त वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या लोकांची मदत होईल. आजारपण दूर होईल. नशीबाची साथ आहे, अडकलेले पैसे परत मिळतील. 

धनु- नोकरी, पैसे आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नवी नोकरी किंवा बढतीच्या प्रतिक्षेत असाल तर तुम्हाला या प्रयत्नांना यश मिळेल. उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल. नव्या लोकांच्या संपर्कात याल. इतरांची मदत मिळेल. 

मकर- महत्त्वाचं काम पूर्णत्वास जाईल. जुन्या कामाच्या पूर्ण होण्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. इतरांच्या पुढे जाण्याची तुमची इच्छा आज आणखी बळावेल. 

कुंभ- आज खंबीरपणे प्रसंगाना सामोरं जाल. दिवसभर पैशांचा विचार घोंगावत राहिल. नव्या कामाची जबाबदारी मिळेल. दैनंदिन कामं वाढतील. धीर बाळगा. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या प्रगतीचा विचार कराल. पुढे जाण्यासाठी काहीतरी नवं शिकाल. आरोग्याची चिंता कमी होईल. 

मीन- केलेल्या कामांचा काही ना काही फायदा नक्की होईल. पैसे मिळण्याची शक्यता. पैशांचे विचार मनात घर करुन राहतील. कागदोपत्री व्यवहारावर लक्ष द्या. फिरायला जाण्याचे योग आहेत. 

-दीपक शुक्ला