आजचे राशिभविष्य | रविवार | ३ फेब्रुवारी २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 3, 2019, 08:56 AM IST
आजचे राशिभविष्य | रविवार | ३ फेब्रुवारी २०१९ title=

मेष- कोणतीही गोष्ट निकालात निघण्याच्या प्रतिक्षेत असाल तर शांत राहा, सर्वकाही ठीक होणार आहे. कामाच्या ठिकाणी नियमित गोष्टींपासून काहीतरी वेगलं करण्याचा प्रयत्न करा, यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 

वृषभ- तुमच्या मतांनी इतरांना प्रभावित कराल. कामाच्या ठिकाणी कनिष्ठ सहकाऱ्यांकडून थोडा त्रास होईल. विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल. 

मिथुन- नियमित कामं आटोपण्यासाठी जास्त प्रयत्न करा. जबाबदारीवर लक्ष ठेवा. तुमच्या हाती असणारी वेल आणि धैर्याचा पूरेपूर वापर करा. शांत डोक्याने काम कराल त्यातच यशस्वी व्हाल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

कर्क- अर्थार्जनात यशस्वी व्हाल. कामाव्यतिरिक्त इतरही कामं तुम्हाला मिळतील. जुने वाद आणि मतभेद मिटतील. इतरांचा दृष्टीकोन लक्षात घ्या. 

सिंह- कामाव्यतिरिक्त इतरही कामं तुम्हाला मिळतील. जुने वाद आणि मतभेद मिटतील. इतरांचा दृष्टीकोन समजण्याचा प्रयत्न करा. आनंदवार्ता ऐकण्यास मिळेल. 

कन्या- दिवस चांगला आहे. भावनांवर ताबा ठेवा तरच फायदा होईल. विभिन्न लिंगाच्या व्यक्तीशी कामाच्या ठिकाणी जास्त वार्तालाभ होईल. त्याच व्यक्तींकडून तुम्हाला मदतही होईल. वेळेत कामं पूर्ण होतील. मानसिक स्थिती चांगली असेल. 

तुळ- धैर्य आणि बुद्धीच्या बळावर बिघडलेली परिस्थिती सुधारू शकाल. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे इतरांचीही मदत मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. कामात मन लागेल पण, संयम राखा. देवदर्शनास जाण्याचा योग. 

वृश्चिक- अतिशय सोप्या मार्गाने कामं पूर्ण होतील. अडकलेल्या कामांवर तोडगा निघेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची चिन्हं आहेत. साथीदाराची मदत मिळेल. सगळ्यांशी नम्रतेने वागा. मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. कायदेशीर व्यवहारांवर लक्ष ठेवा. 

धनु- गेल्या काही दिवसांपासून ज्या कामाविषयी विचार करत आहात ती आज पूर्णत्वास जाऊ शकतात. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. प्रयत्नांना यश मिळेल. काहीतरी नवं शिकण्याती संधी मिळेल. नशीबाची साथ आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. 

मकर- बेरोजगारांना रोजगार मिळेल. ज्या गोष्टींवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहात त्यापासून दूर राहा. महत्त्वाची कामं आटोपण्यासाठी काही खास व्यक्तींची मदत मिळेल. नवं काही शिकण्याची संधी मिळेल. शारीरिक व्याधी दूर जातील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. 

कुंभ- दिवस सर्वसामान्य असेल. अडचणींमधून स्वत:ला सांभाळा. विभिन्न लिंगाच्या व्यक्तींसोबत भावनात्मक विषयांवर चर्चा कराल. वादग्रस्त प्रकरणांपासून स्वत:ला दूर ठेवा. काही वादांचा तोडगा परस्पर सामंजस्याने निघेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास अडकलेले पैसे परत मिळतील. 

मीन- दैनंदिन आणि कोणाच्या साथीने होणारी कामं वेळेत पूर्ण होतील. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. पैसे आणि इतर व्यवहारांसाठी फायद्याचा दिवस. कामाच्या व्यापात व्यग्र असाल. तुमच्याकडे काही महत्त्वाची आणि जबाबदारीची कामंही येतील. 

- दीपक शुक्ला