आजचे राशीभविष्य | २५ नोव्हेंबर २०१९ | सोमवार

कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Nov 25, 2019, 08:04 AM IST
आजचे राशीभविष्य | २५ नोव्हेंबर २०१९ | सोमवार  title=
संग्रहित छायाचित्र

मेष - कामाच्या व्यापासोबतच तुमची जबादारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यापारात समजुतदारपणे काम करा. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. प्रवासयोग आहेत. 

वृषभ- जुने वाद मिटतील. स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी करण्याचा योग आहे. सक्रियतेचा स्तर वाढेल. कामं पूर्णत्वास न्याल. मिळकत आणि खर्चावर लक्ष ठेवा. मित्रपरिवाराची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अशी काही कामं पूर्णत्वास न्याल ज्यांचा तुम्हाला फायदा होणार आहे. बुद्धिचातुर्याने सर्व कामं पूर्ण कराल. एखादी शुभवार्ता मिळेल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत होईल. कामकाजाविषयी काही चांगल्या कल्पना विचाराधीन असतील. 

सिंह- आर्खित परिस्थिती काही महत्त्वाचे बदल होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. मेहनतीने केलेल्या सर्व कामांचं फळ मिळेल. 

कन्या- आज तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. दिवसही चांगला आहे. मोठ्या प्रमाणात यश मिळेल. दैनंदिन कामांचा फायदा होईल. कौटुंबीक समस्या सोडवण्यात सहभागी व्हाल. 

तुळ- विचाराधीन कामं पूप्ण कराल. चांगल्या कामांचा साक्षीदार होण्याची संधी आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. 

वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायद्याच्या ठरतील. समजुतदारपणे वागा. नवे करार फायद्याचे ठरतील. दिवस चांगला असेल. आजार दूर होतील. नशीबाची साथ मिळेल. 

धनू- नोकरी, करिअर आणि पैशांच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीचं यश मिळणार आहे. उत्साह परमोच्च शिखरावर असेल. नशिबाची साथ मिळणार आहे. 

मकर- एखादं महत्त्वपूर्ण काम कराल. ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. मेहनत करा, फायदा होईल. नवी कामं सुरु करण्याऐवजी जुनी कामं पूर्ण करण्यावर भर द्या. 

कुंभ- दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. धैर्याने काम करा. पुढे जाणयासाठी काहीतरी नवं शिकण्याचीही संधी मिळेल. 

मीन- आज तुम्ही जे काम कराल, त्याचा फायदाच होणार आहे. आर्थिव व्यवहारांचाच विचार कराल. कागदोपत्री काम निकाली काढा. प्रवासयोग आहेत.