आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ५ एप्रिल २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Apr 5, 2019, 09:22 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ५ एप्रिल २०१९ title=

मेष - कामात वेगाने वाढ होईल. व्यवसायात फायदा होईल. एखाद्यासाठी तुमची मदत होऊ शकते. मनात चांगले विचार येतील. जुन्या आठवणी आनंद देतील. जमीनच्या विक्रीने फायदा होईल. नशीबाची साथ मिळेल. पैशांसंबंधी अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील.

वृषभ - जवळपासची काही लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. पैशांची गरज वाढेल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. तुमच्या विचारात बदल होईल. प्रयत्न सुरू ठेवा. पुढील योजना आखण्यापेक्षा आताच्या कामावर लक्ष द्या. जोडीदार तसेच मुलांची साथ मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. व्यवसायात फायदा होईल. 

मिथुन - स्वत:साठी पुढील मार्ग स्वत:च शोधाल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे. मित्रांकडून एखाद्या नव्या व्यवसायाबाबत किंवा गुंतवणूकीबाबत माहिती मिळेल. महत्त्वाच्या जबाबदारीकडे लक्ष द्या. दुसऱ्यांना मदत केल्याने तुम्हालाही समाधान मिळेल. करियरच्या योजनांसाठी दिवस चांगला आहे. अधिकाऱ्यांकडून एखादी जबाबदारी मिळू शकते. 

कर्क - कामात उत्साह वाढेल. करियरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. ऑफिसमध्ये येणाऱ्या पुढील दिवसांची तयारी कराल. प्रयत्न कराल तर गोष्टी सुटू शकतील. कौटुंबिक गोष्टींबाबत तुमच्या मनात जे येईल तेच करा. जबाबदारीकडे लक्ष द्या. 

सिंह - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागतील. कामात मन लागल्याने नोकरीत पुढे जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे अधिक कल वाढेल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ कमी वाटेल. आराम करा. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. 

कन्या - महत्त्वाची कामं लवकर पूर्ण होतील. रखडलेले पैसे मिळतील. गुंतवणूकीत वाढ होईल. योजना सफल होतील. नोकरी, व्यवसायात टार्गेट पूर्ण कराल. एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. काही नातेसंबंधांत मजबूती येईल. 

तुळ - कोणतेही काम हातात घेण्याआधी पूर्ण विचार करा. कुटुंबाकडून मदत मिळेल. जवळच्या लोकांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज येईल. जुन्या मित्रांशी भेट होईल. धनलाभाची शक्यता आहे. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल.

वृश्चिक - एखाद्या मित्राची ओळख प्रभावी ठरेल. नोकरीत एखाद्याच्या सल्ल्याने तुमच्या जीवनात बदल होईल. अधिकतर गोष्टी सहजरित्या पूर्ण होतील. विचार-करून कामं करा. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. वडिलांच्या मदतीने मोठी कामं पूर्ण होण्याचा योग आहे. 

धनु - व्यवसायात फायदा होईल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. काही लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. गुंतवणूकीच्या बाबतीत खोलवर जाऊन विचार करा. चालू नोकरीत बढतीची शक्यता आहे. नवीन नोकरीचा योग आहे. तुमच्या बुद्धीने व्यवसाय, नोकरीत फायदा होऊ शकतो. एखाद्या कडून सल्ला घेतल्यास समस्या सुटू शकतील. 

मकर - नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. जुन्या मित्रांशी भेट होईल. कोणतंही काम सुरू करण्याआधी मित्र किंवा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. व्यवसाय वाढवण्यासाठी योजना आखाल. 

कुंभ - जोडीदाराच्या यशाने आनंद होईल. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या नजरेत तुमच्यासाठी आदर वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. काम वाढेल. कामात नवीन मित्रांची मदत होईल. प्रवास फायद्याचा ठरेल.

मीन - करियरमध्ये नवीन ऑफर मिळेल. रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. सकारात्मक राहून कामं पूर्ण करा. दिवस ठीक आहे. विचार केलेल्या योजनांमध्ये स्वत:च बदल कराल. सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील.