आजचे राशीभविष्य | सोमवार | १० जून २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  

Updated: Jun 10, 2019, 08:22 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | १० जून २०१९ title=

मेष- राहणीमानात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. कोणत्याच गोष्टीची चिंता करु नका. विश्वास ठेवून पुढे चालत राहा. जुनं काही विसरलात तर त्याचा फायदाच आहे. चांगल्या बदलाच्या काळातून प्रगतीपथावर जाण्याची चिन्हं आहेत. शुभवार्ता मिळेल.

वृषभ- आज तुमचं सर्व लक्ष हे कावामवरच असेल. शक्य असेल तितके विचार आणि व्यवहार सकारात्मक ठेवा. काही नवे अनुभव मिळतील. प्रवासयोग आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. व्यवसायातील करारांविषयी गांभीर्याने विचार कराल. 

मिथुन- करिअरमध्ये आणखी आशावादी व्हाल. ज्या गोष्टीसाठी फार काळापासून आग्रही होतात, त्यात यश मिळेल. अडचणी दूर होतील. परिस्थिती सुधारेल. भावंडांची मदत मिळेल. जवळच्या नात्यांमधून आनंद मिळेल. 

कर्क- प्रत्येक कामासाठी शारीरिक आणि मानसिक रितीने तयार राहा. प्रेमसंबंधांमध्ये नातं आणखी दृढ होईल. अडचणी स्वत:च दूर कराल. मोठ्य़ा भावाचं सहकार्य मिळेल. व्यापारउद्दीमाच्या दिशेने वाटचाल कराल. 

सिंह- कामं पूर्णत्वास जाऊन त्याचा फायदा मिळेल. करिअरमध्ये लवकरच काही चांगल्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. परिस्थिती सुधारेल. विचाराधीन कामं पूर्णत्वास नेऊ शकाल. कोणा एकाचा भावनिक आधार देऊ शकाल. 

कन्या- जुन्या अडचणींवर तोडगा निघेल. मित्र किंवा साथीदाराला एखादं वचन द्याल. अनेकजण तुमच्या कामांवर लक्ष ठेवून असतील. वेगळ्याच मार्गाने एखाद्याची मदत करु शकाल. गरज पडल्यास तुम्हाला अपेक्षित मदत मिळेल. 

तुळ- नोकरीच्या ठिकाणी तुम्ही सुचवलेल्या पर्य़ायांचा विचार केला जाईल. नव्या व्यापाराविषयी विचार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.  वेळेसोबतच काही अडचणी सहजपणे दूर होतील. 

वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायात तुमच्यासोबत काही चांगल्या घटना घडतील. ज्यांचा तुम्हालाच फायदा होणार आहे. आज होणारे बदल हे तुमच्या बाजूने असतील. प्रत्येक बाबतीत खुलेपणाने विचार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज काही अडचणींवर व्यवहारी मार्गांनी तोडगा काढाल. 

धनू- आजचा दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीपथाच्या दिशेने वाटचाल कराल. कोणत्याच अडचणीचा सामना करत असल्यास त्यावर तोडगा काढण्याचाच प्रयत्न कराल. 

मकर- अनेक रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. संधी मिळाल्यास काही काळ एकांतात राहा. घरगुती सामानाची खरेदी कराल. बाहेरगावी प्रवास करण्याचा योग आहे. नव्या कामाची आखणी कराल. 

कुंभ- हळू- हळू कामाचा वेग वाढेल. फायदा मिळवण्यासाठी दिवसभर काहीतरी प्रयत्न करत राहाल. प्रसन्न असाल. दृष्टीकोन सकारात्मक असेल. प्रयत्नांना य़श मिळेल. 

मीन- दिवश बऱ्याच अंशी शुभ असेल. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. रेंगाळलेली कामं पूर्ण होतील. आज होणाऱ्या ओळखी आणि भेटीगाठी फायद्याच्या ठरतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.