आजचे राशीभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 23, 2019, 08:29 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कामात गती मिळेल. जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यवसायाच्या बाबतीत समजुतदारपणे काम करा. बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. 

वृषभ- जुने वाद, तणाव दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नव्या कपड्यांची खरेदी कराल. सक्रियतेचा स्तर वाढेल. कामं पूर्ण होतील. यशस्वी होण्यासाठी धीर बाळगा. मित्रांकडून मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जो फायदा होईल तो दीर्घकाळासाठी चालेल. अनेक योजना आखाल. मित्रपरिवाराचं सहकार्य मिळेल. आज तुम्ही आनंदी असाल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक अडचणींवर मात कराल. काही वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. व्यवहारकौशल्याचा फायदा होईल. 

सिंह- आर्थिक परिस्थितीत मोठे बदल होतील. महत्त्वाकांक्षा वाढेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. मेहनत करा. एखाद्या गोष्टीवर तोडगा निघेल. अडचणीची कामं मार्गी लावाल. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. दिवस तुमच्यासाठी बेताचाच आहे. दैनंदिन कामांमध्ये फायदा होईल. जुनी कामं पूर्ण होतील. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. सामूहिक कामांसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कर्जरुपी दिलेले पैसे परत मिळतील. 

वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायद्याच्या ठरतील. समजुतदारपणे काम करा. नवे व्यवहार फयाद्याचे ठरतील. दिवस चांगला असेल. नशिबाची साथ मिळेल. 

धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. नव्या नोकरीचा प्रयत्न करा. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. अनेकांच्या मदतीसाठी तयार असाल. 

मकर- एखादं महत्त्वाचं काम असल्यास ते पूर्ण कराल. जुन्या कामांचा फायदा होईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

कुंभ- धीराने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. दैनंदिन कामांचा व्याप असेल. पुढे जाण्यासाठी काही नव्या गोष्टी शिकाल. आरोग्याची चिंता दूर होईल. 

मीन- आज तुम्ही जे काही काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. दैनंदिन कामांतून अर्थार्जनाची संधी मिळेल. कागदोपत्री व्यवहारांवर लक्ष ठेवा.