Chaturgrahi Yog: धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Chaturgrahi Yog 2024: आदित्य मंगल राजयोगाव्यतिरिक्त बुधादित्य योग देखील तयार होत आहे. दरम्यान या योगांमुळे काही राशींना अधिक फायदा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 25, 2024, 07:20 AM IST
Chaturgrahi Yog: धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ title=

Chaturgrahi Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशीबदलामुळे अनेक योग तयार होतात. यावेळी एका राशीत एक किंवा त्याहून जास्त ग्रहांचा देखील प्रवेश होतो. यावेळी पुन्हा एकदा चार ग्रह एकाच वेळी राशीत येणार आहेत. ज्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे.

तीन योग आणि एका राजयोगाचा समावेश 

धनु राशीमध्ये मंगळासोबत सूर्य, बुध आणि चंद्र उपस्थित असल्याने चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. यावेळी तीन योग आणि एक राजयोग देखील तयार होतोय. यामध्ये आदित्य मंगल राजयोगाव्यतिरिक्त बुधादित्य योग देखील तयार होत आहे. दरम्यान या योगांमुळे काही राशींना अधिक फायदा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

मेष रास

मेष राशीसाठी चतुर्ग्रही योग शुभ राहणार आहे. यश मिळण्यासोबतच कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. या काळात तुम्हाला पदोन्नतीची शक्यता असणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून नोकरीत चांगली संधी मिळू शकते. अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.

सिंह रास

सिंह राशीला पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानाचा लाभ मिळणार आहे. कुंडलीच्या पाचव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळू शकते. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

धनु राशीमध्ये चार प्रमुख ग्रहांचा संयोग होणार आहे. यासोबतच भविष्यात मला लाभ मिळेल. कामे पूर्ण होतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला आहे. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. शुभ काळ सुरू होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने उत्कृष्ट परिणाम होतील. चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )