Chaturgrahi Yoga: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेकदा ग्रहांशी संयोग बनवून चतुर्ग्रही योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर दिसून येतोय. एप्रिलच्या मध्यात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
यावेळी शुक्र, बुध, मंगळ आणि राहू यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींसाठी संपत्ती, यशाचा मार्ग खुला होईल. त्याशिवाय काही राशींच्या आयुष्यात सुख चालून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ मिळणार आहे.
चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या संधीही मिळतील. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश आणि परदेशातही प्रवास करू शकता. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग अनुकूल ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे जीवन खूप आनंदी जाणार आहे. त्या बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. तसेच, नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता असेल. तसेच, जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला या कालावधीत चांगला नफा मिळू शकेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या लव्ह पार्टनरशी संबंधित एक मोठे सरप्राईज मिळू शकते. जे लोक रिअल इस्टेट, मालमत्ता, वैद्यकीय आणि अन्नाशी संबंधित व्यवसाय करतात ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. इतर माध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवू शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )