Planet Transit In December 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह आपल्या भ्रमण कालावधीनुसार राशी बदल (Grah Gochar) करत असतात. प्रत्येक ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी ठराविक कालावधी असतो. डिसेंबर महिन्यातही काही ग्रह राशी बदल करण्यात आहेत. बुध (Budh), सूर्य (Surya) आणि शुक्र (Shukra) मकर राशीत असणार आहेत. तर शनि ग्रह याच राशीत असून मार्गस्थ झाले आहेत. त्यामुळे मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. मात्र पाच राशींना या काळात चांगली फळं मिळणार आहेत. मिथुन, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
मिथुन (Mithun)- मकर राशीतील चतुर्ग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या काळात केलेल्या कामाचं फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. स्थावर मालमत्तेतूनही लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंधही सुधारतील, जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक (Vrushchik)- या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना लाभदायक असणार आहे. स्थावर मालमत्ता संबंधित प्रकरणांमध्ये लाभ होईल. वाहन खरेदीचे योग जुळून येईल. गेल्या काही दिवसात अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.
मकर (Makar)- चार ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीसाठी डिसेंबर महिना चांगला जाणार आहे. लाभ आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. यामुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांच्या मदतीने अनेक कामे होतील. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल.
कुंभ (Kumbh)- या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना शुभ परिणाम देईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. सकारात्मक वातावरण असल्याने तणावमुक्त व्हाल. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक विधी आणि तीर्थक्षेत्री जाण्याचा योग देखील आहे.
बातमी वाचा: Astrology 2023: येणारं वर्ष 'या' राशींसाठी ठरणार लकी, नोकरी आणि व्यवसायात होणार प्रगती
मीन (Meen)- या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना शुभ असणार आहे. गेले काही दिवस अडचणीचे असले तरी आता ग्रहांची चांगली साथ मिळेल. विशेष म्हणजे गुरु ग्रहही मार्गस्थ होणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. या दरम्यान नोकरदार लोकांना प्रगती होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखकर राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)