Chandra Mangal Yog In Kanya: वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रह येऊन खास योग तयार होतो. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो.
चंद्राशी एक किंवा दुसर्या ग्रहाच्या संयोगाने शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:36 वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आधीच कन्या राशीत असल्याने चंद्र मंगळ योग तयार होताना दिसतोय. दरम्यान चंद्र मंगळ योग तयार झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांना चंद्र मंगळ योग तयार झाल्याने विशेष लाभ मिळू शकणार आहे. शत्रूंवर विजय मिळवता येणं शक्य होणार आहे. यावेळी तुम्ही कायदेशीर बाबींमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाच्या सहकार्याने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वैवाहिक जीवनातही आनंद राहणार आहे. या काळात तुम्ही करत असलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील.
या राशीच्या लोकांसाठी चंद्र मंगळ योग लाभदायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना मालमत्ता, पैसा आणि वाहन खरेदीचे सौभाग्य मिळणार आहे. तसंच तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही यश मिळू शकतं. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील.
या राशीच्या लोकांसाठी चंद्र मंगळ योग फायदेशीर ठरू शकणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकही यश मिळवू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. करिअरच्या प्रगतीसाठी हा काळ चांगला आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )