Chandra Gochar 3 October To 9 October: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात कमी कालावधीत राशी बदलणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी चंद्र ग्रहाला सव्वा दोन दिवसांचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. रोहिणी, हस्त आणि श्रवण या नक्षत्रांचा स्वामी आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात. चंद्राच्या राशी बदलाचा बारा राशींवर परिणाम होतो.
चंद्र ग्रहाच्या गोचरामुळे विष आणि गजकेसरी योग तयार होणार आहे. चंद्र ग्रह 4 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत या आधीच शनि ग्रह असल्याने विष योग तयार होत आहे. हा विष योग 6 ऑक्टोबर 2022 सकाळी 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि विष योग संपुष्टात येईल.
पुरुषांची ही गुपितं स्त्रियांना कळतच नाहीत, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti
8 ऑक्टोबर 2022 रोजी चंद्र सकाळी 11 वाजून 23 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत यापूर्वीच गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. हा योग 10 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)