Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब

Chandra Gochar 2023 :  7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 5, 2023, 05:35 AM IST
Chandra Gochar 2023 : 7 ऑगस्टला त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग! 'या' राशींचं चमकणार नशिब title=
Chandra Gochar 2023 gajkesari rajyog Trigrahi Yog 2023 and Guru Chandal Yog three zodiac signs get Wealth

Chandra Gochar 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह सर्वात संथ गतीने आपली रास बदलतो. तर चंद्र हा सर्वात जलद गतीने आपलं स्थान बदलतो. शनिदेव अडीच वर्ष एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानी जातो. तर चंद्र सव्वा दोन दिवसांमध्ये आपली स्थिती बदलतो. चंद्र गोचर ऑगस्ट महिन्यात 14 आपली स्थिती बदलणार आहे. चंद्र 7 ऑगस्टला मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. तर याच दिवशी शुक्र ग्रह कर्क प्रवेश करणार आहे. वैदिक पंचांगानुसार 7 ऑगस्टला चंद्र दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मेष राशीत गोचर करणार आहे. मेष राशीत पूर्वीच राहु आणि गुरुचं संयोग झाला आहे.  (Chandra Gochar 2023 gajkesari rajyog Trigrahi Yog 2023 and Guru Chandal Yog three zodiac signs get Wealth)

त्यामुळे मेष राशीत गुरु, राहु आणि चंद्राच्या भेटीने त्रिग्रही योग आणि ग्रहण योग तयार होतो आहे. त्यासोबत गजकेसरी योग आणि गुरु राहुच्या युतीमुळे चांडाळ योग असणार आहे. पुढे 9 ऑगस्टला चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी गोचर करणार आहे. त्यावेळी गजकेसरी आणि ग्रहण योग संपणार आहे. पण सव्वा दोन दिवस तीन राशीच्या जातकांसाठी लाभदायक असणार आहे. 

'या' राशींना होणार लाभ 

मेष (Aries)

 

मेष राशीमध्ये शुभ योग जुळून येतो आहे. या राशीत गजकेसरी योगामुळे या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांना नशिबाची साथ काय असते त्याची अनुभूती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी दिलासादायक वातावरणामुळे तुम्ही आनंदी असाल. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे.  

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत गजकेसरी योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना कामाचा ठिकाणी फायदा होणार आहे. कायदेशीर प्रकरण त्यांचा बाजूने लागणार आहे. वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. तुमच्या शब्दाला मान मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कामंही सहज मार्गी लागणार आहे. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या कुंडलीत शुभ अशुभ योग असणार आहे. गजकेसरी योग या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या योगामुळे व्यक्तिमत्त्वात वेगळीच चमक मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा फलदायी असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ नफा देणारा असणार आहे. अचानक यांना धनलाभ होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)