Chanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला

Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.

Updated: Sep 2, 2023, 11:26 PM IST
Chanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला title=
financial crisis Chanakya Niti

Chanakya Niti On financial crisis: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवले. चाणक्याने आपल्या नीती ग्रंथात आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.

वायफळ खर्च

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीकडे धन आलं तर त्याला आवडत्या गोष्टींवर पैसा खर्च करायला आवडतो. प्रथम तो आपल्या दैनंदिन जीवनाला गरजेच्या गोष्टींवर खर्च करतो. तसेच तो वायफळ खर्च देखील करतो. त्यामुळे त्याला गरिबीला सामोरं जावं लागतं. ज्यावेळी पैसा नसतो, त्यावेळी व्यक्ती आपल्या कुटुंबाला अडचणीत आणतो, असं चाणक्य म्हणतात.

चांगली वर्तवणूक 

समाजात वावरताना आपली वर्तवणुक चांगली असली पाहिजे. वडील, विद्वान, महिला आणि गरिबांचा नेहमी आदर करावा. जे लोकं अशा लोकांना अपमानीत करतात त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. त्यामुळे धनप्राप्ती होत नाही, असं चाणक्य सांगतात.

आरोग्य सांभाळा 

आरोग्य ही सर्वात मोठी धनसंपदा आहे, असं चाणक्य म्हणतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. अशी लोक जे आरोग्याकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. त्यांच्या खिशात पैसे राहत नाहीत, असं चाणक्यांनी सांगितलंय. आर्थिक नुकसान, हानी, रोगापासून वाटायचं असेल तर स्वयंपाकघर आणि परिसर स्वच्छ असावा, असं चाणक्य म्हणतात.

आणखी वाचा - Chanakya Niti: 'अशा' महिला पतीच्या कोणत्याही गोष्टीवर कधीही नसतात संतुष्ट; नेहमी करतात भांडणं

सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारणं फारच अशुभ आहे. संध्याकाळी झाडून घेतल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते आणि गरिबी तुमच्या जवळ येते, असंही आचार्य चाणक्य म्हणतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )