Chankya Niti: आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्राची तत्त्वे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. सामान्य जीवनातील नातेसंबंधांवर चाणक्यचे विचार जर कोणी त्यांच्या जीवनात आत्मसात केले तर ती व्यक्ती चांगलं जीवन जगू शकते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, नातेसंबंध तसंच इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितलंय. अशा परिस्थितीत चाणक्याने पती-पत्नीच्या नात्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
प्रत्येक व्यक्तीला त्याचं वैवाहिक जीवन चांगले ठेवायचं असतं. यामध्ये एकमेकांना अनेक प्रकारे संतुष्ट करणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या भावना आणि विचारांचा आदर केला पाहिजे. यावेळी केवळ एकाने नाही तर दोघांनीही एकमेकांबद्दल काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांत महिलांनी पुरुषांबद्दल कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची मागणी पुरुषांनी केली तर महिलांनी कोणतीही अडी न धरता त्या पूर्ण केल्या पाहिजेत.
पती-पत्नीमध्ये प्रेमाचा अभाव असेल तर नात्यात कधीच प्रेम येऊ शकत नाही. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ लागतो. अशा परिस्थितीत पत्नीने पतीच्या प्रेमाच्या इच्छेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पत्नीचे पतीवर नेहमीच प्रेम असलं पाहिजं. हे पतीसाठी देखील आवश्यक आहे. पतीला समाधानी ठेवण्यासाठी पत्नीला भावनिक प्रेम आणि शारीरिक प्रेम दोन्ही दिलं पाहिजे.
पतीपेक्षा पत्नी नेहमीच एक उत्तम व्यवस्थापक असते. पत्नीने नेहमी पतीच्या सुख-दु:खात पतीसोबत उभं राहावं आणि पतीला नेहमी आनंदी ठेवावं. पत्नी ही एकमेव स्त्री असते जी पतीला बळ देऊ शकते. जर तुम्हाला चांगले नातेसंबंध जपायचे असतील तर तुमच्या पतीच्या छोट्याशा आनंदात स्वतःसाठी आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत पत्नीने नेहमी पतीच्या दुःखाचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकमेकांच्या विचारांचा आदर करणं, नात्यात गोडवा राखणं अत्यंत आवश्यक आहे. जर पती-पत्नीच्या नात्यात या गोष्टींचा अभाव असेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. यावेळी पतीच्या इच्छेची काळजी घेणं हे पत्नीचं कर्तव्य आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )