Chanakya Niti About Money:आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मानवी जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये ज्ञानाचा अद्भूत भांडार दडलेले आहे. त्यांची धोरणे आणि शब्द पूर्वीच्या काळात जितके प्रभावी होते तितकेच आजही प्रभावी आहेत. ज्यांनी त्यांच्या धोरणांचे पालन केले त्यांनी जीवनात यश मिळवले. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या आर्थिक जीवनापासून ते वैवाहिक जीवनाविषयीही सांगितले आहे. त्यांची ही धोरणे अनेक प्रकारच्या संकटांवर रामबाण उपाय मानली गेली आहेत. त्यांनी जास्त पैसे कमविल्यानंतर कोणती चूक करु नका, असे सांगितले आहे. जर ही चूक केली तर तुम्हाला भविष्यात पैसा पैसा करण्याची वेळ येईल, अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या आणि काही गोष्टी करा, असा सल्ला दिला आहे.
आज प्रत्येकासाठी पैसा महत्वाचे साधन बनले आहे. पैसे नसतील तर अनेक कामे अडकतात. त्यासाठी पैसे कमविण्यावर त्यांचा भर असतो. मात्र, पैसे कमावल्यानंतर नेहमी जमा किंवा बचत करु नये. त्यातील काही भाग दान किंवा सत्कर्मासाठी वापरावा. कंजूष लोकांच्या घरातही माता लक्ष्मी थांबत नाही, असे चाणक्य नीतिमध्ये सांगितेल आहे.
चाणक्य नीतिनुसार मनुष्याच्या कृतीमुळे चांगले आणि वाईट परिणाम मिळतात. अशा वेळी चांगले कर्म करत राहा, वाईट कर्मांचे फळ एक दिवस वाईटच मिळते. वाईट कर्माचे फळ मनुष्याला दारिद्र्य, दुःख, रोग, बंधने आणि संकटे या स्वरुपात मिळते, असे चाणक्य नीतित म्हटलेय.
माणसाने नेहमी नैतिक कर्माने पैसा कमवला पाहिजे. वाईट कृत्ये करुन किंवा एखाद्याला त्रास देऊन किंवा फसवून कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही. असा पैसा एक ना एका मार्गाने खर्च होतो. अशा व्यक्तीलानंतर आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागतो आणि पैसा पैसा करण्याची वेळ येते.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, पैसा कमावल्यानंतर त्याची बचत जरूर करा, परंतु पैशाचा नेहमी आदर करा. जे लोक पैशाचा आदर नरत नाहीत, अशा लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते. आणि ती त्यांच्यापासून दूर किंवा निघून जाते. अशा लोकांना पुन्हा गरिबी आणि गरिबीचा सामना करावा लागतो.