Chanakya Niti : सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरा बायकोमध्ये प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा आहे. नात्यामध्ये कटुता येऊ नये म्हणून नवरा बायकोने काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. एकमेकांना वेळ देणं, मदत करणं आणि प्रेम तर असतंच...पण त्याशिवाय एकमेकांपासून कधीही काही लपवू नयेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका नवऱ्याला त्यांच्या आयुष्यातील चार गोष्टी कधीही सांगत नाहीत. असं केल्यामुळे नात्यामध्ये तणाव येऊ शकतो. पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार या गोष्टी त्यांनी न सांगणेच त्याच्या नातील मजबूत होण्याचे कारणं असतं. कुठल्या आहेत अशा गोष्टी जाणून घेऊयात. (Chanakya Niti A wife never lets her husband know these 4 things)
बायकांवर घराची आणि घराच्या आर्थिक गणित सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे बचत करुन ती घरात व्यवहार करत असते. म्हणूनच तिला लक्ष्मी असं म्हटलं जातं. बायका घरात असे अनेक ठिकाण असतात जिथे त्या पैसे लपवून ठेवतात. जेणे करुन संकट काळात त्यातून मदत होईल. ही बचत ती कधी नवऱ्याला कळू देत नाही.
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, बायका किंवा घरातील स्त्री आपल्या आरोग्याच्या समस्या कधीही नवऱ्याला सांगत नाही. त्या अनेक वेळा आजारपण अंगावर काढतात. याची अनुभूती तुम्हालाही आली असेल. घरातील स्त्री हे आपल्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करत असते असं म्हणं वावग ठरणार नाही. ती आपल्या नवऱ्याला कधीही आपलं दुखणं सांगत नाही. दुसरीकडे त्यांचं हे न सांगण्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरतात.
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, लग्नापूर्वीच एखाद प्रेम प्रकरण असो ते नवऱ्याला सांगत नाही. त्याशिवाय प्रत्येकाला आयुष्यात कुणीतरी आवडतं असतं, पण हे गुपित कधीही नवऱ्याला काय अगदी जवळच्या कोणालाही कळू देत नाहीत.
पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि प्रणय हे महत्त्वाचं असतं. प्रणयामुळे नवरा बायको मनाने जवळ येतात. दोघांमधील त्या क्षणाबद्दल जेव्हा पती तिला विचारतो, तेव्हा ती प्रणयाबाहत सगळं काही नवऱ्याला सांगत नाही. शिवाय तिची प्रणयाची इच्छा झाली तरी ती कधी नवऱ्याला बोलून दाखवत नाही. तिच्या या इच्छेबद्दल किंवा प्रणयासंबंधित कल्पनेबद्दल ती नवऱ्याला सांगत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)