मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. गेल्या महिन्यात, बुध ग्रहानं कन्या राशीत प्रवेश केला होता, जिथे सूर्य आधीच बसला होता. यावेळी सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह कन्या राशीमध्ये बसले आहेत, ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येत आहे. बुध आणि सूर्य एकाच राशीत बसल्यास बुधरादित्य योग तयार होतो असे म्हणतात. बुध देवाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीत असेल तर त्याचं भाग्योदय सुरु होते. 18 ऑक्टोबरपर्यंत बुध कन्या राशीत राहणार आहे. बुध कन्या राशीत राहिल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. काही राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होईल. मेष, मिथुन, कन्या, धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे.
मेष - कन्या राशीत बुधाचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे काम करण्याचा विचार करत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. कामात यश मिळेल. 18 ऑक्टोबरपर्यंतचा काळ खूप खास आहे. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. या काळात तुम्ही जमीन आणि वाहने खरेदी करू शकता.
मिथुन - मेष सोबतच मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप खास आहे. व्यवसायात नवीन संपर्क साधण्यात यश मिळेल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळू शकेल. याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. या काळात तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सुरुवात करू शकता.
कन्या - बुधरादित्य योग या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्याचा फायदा होईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)