Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस

Budhaditya Yoga May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य आणि बुध यांचा जबदरदस्त योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पडणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: May 7, 2023, 09:22 AM IST
Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस  title=
budhaditya yoga 2023 Surya Gochar Budh Gochar on 15 may 2023 zodiac signs get Money

Budhaditya Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य (Surya Dev 2023) हा ग्रहांचा राजा मानला जातो. तर बुध (Budh Dev 2023) हा राजकुमार मानला जातो. असा हा राजा आणि राजकुमारचं लवकरच गोचर होणार आहे. त्यामुळे खास योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य योग हा पाच राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींच्या लोकांवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (astrology news in marathi)

कधी आहे ग्रहांचं गोचर?

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध गोचर (Surya Budh Gochar 2023) 15 मे 2023 ला होणार आहे. सूर्य देव (Surya Gochar 2023) 15 मे 2023 सकाळी 11.32 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य एक महिना वृषभ राशीत असणार आहे. 15 मे 2023 ला बुध ग्रह (Budh Gochar 2023) हा मेष राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 15 जून 2023 संध्याकाळी 18:07 वाजता बुध हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य जवळजवळ असणार आहे आणि त्यातून बुद्धादित्य योग तयार झाला आहे. (Budhaditya Yoga 2023)

मेष (Aries)

सूर्य आणि बुधाचं गोचर तुमच्यासाठी (Budhaditya Yoga 2023) भाग्यशाली ठरणार आहे. बुद्धादित्य योग हा या राशीसाठी चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. करिअरच्यादृष्टीनेही या योग शुभ असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.  (budhaditya yoga 2023 Surya Gochar Budh Gochar on 15 may 2023 zodiac signs get Money)

कर्क (Cancer)

बुधादित्य योगामुळे (Budhaditya Yoga 2023) या राशीच्या लोकांसाठी इच्छापूर्तीचा ठरणार आहे. हा काळ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 

सिंह (Leo)

सूर्य देव हा सिंह राशीच्या स्वामी आहे. त्यामुळे सूर्य गोचर या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. नवीन नोकरीची संधी आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. समाजात तुमची कीर्ती वाढणार आहे. अचानक आर्थिक लाभाचे संकेत आहे. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठीही सूर्य गोचर शुभ योग घेऊन आला आहे. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडणार आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभाचे योग आहेत. परदेशवारीचे संधी मिळणार आहे. नवीन ओळखी होणार आहेत. गुंतवणुकीसाठी शुभ काळ आहे. 

धनु (Sagittarius)

सूर्य आणि बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शत्रूवर मात करण्यात तुम्ही सफल होणार आहात. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कोर्टात कुठला वाद सुरु असेल तर सुटण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Weekly Money Horoscope : 'या' राशींना होईल धनलाभासोबत यशस्वीतेचे शुभ योग

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)