Budh Uday: बुध ग्रहाचा वक्री अवस्थेत होणार उदय; 'या' राशींच्या हाती लागेल बक्कळ पैसा

Budh Planet Uday : ग्रह वेळोवेळी, अस्त आणि उदय होतात. सप्टेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रहाचा उदय होणार येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 9, 2023, 05:40 AM IST
Budh Uday: बुध ग्रहाचा वक्री अवस्थेत होणार उदय; 'या' राशींच्या हाती लागेल बक्कळ पैसा title=

Budh Planet Uday: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याचसोबत ग्रह वेळोवेळी, अस्त आणि उदय होतात. याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होताना दिसतो. असंच आगामी महिन्यात बुध ग्रह उदय होणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रहाचा उदय होणार येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या उदयाचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया बुधाच्या उदयाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

कर्क रास 

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय शुभ असू शकणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. नोकरदार लोकांना करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढणार आहे. छंद पूर्ण करण्यासाठी खूप खर्च करू शकतात. रखडलेली सर्व कामं यावेळी मार्गी लागणार आहेत. 

धनु रास 

बुध ग्रहाचा उदय धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. बुध तुमच्या राशीतून नवव्या भावात उदय होणार आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात नशीब तुमच्यासोबत असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल.

मिथुन रास

बुध ग्रहाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग जुळून आला आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुमचं लव्ह लाईफ चांगलं होणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )