बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार

बुध ग्रहामुळे या राशींचं नशीब पालटणार, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Updated: Mar 20, 2022, 03:52 PM IST
बुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार title=

मुंबई : ज्योतिश शास्त्रानुसार बुद्धी व्यापार आणि वाणीसाठी उत्तम ग्रह म्हणजे बुध ग्रह. बुध ग्रह ज्याच्यावर प्रसन्न असतो त्याला मोठा फायदा होतो असंही म्हणतात. 24 मार्च रोजी बुध मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध एकत्र येऊन जो योग तयार होतो त्याला बुधादित्य योग म्हणतात. 

वृषभ : या राशीच्या लोकांना मानसिक शांतता मिळणार नाही. मन शांत ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकतो. लाईफ स्टाईलमध्ये बदल होणार आहेत. 

कर्क : आत्मविश्वासमध्ये कमतरता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कोणावरही विश्वास ठेवू नका. आर्थिक नुकसान होऊ शकतं. 

मिथुन : व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. बुध ग्रह या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. करियरमध्ये चांगले बदल होऊ शकतात.

तुळ : या राशीच्या व्यक्तींवर जबाबादारी वाढणार आहे. मानसिक अशांतता राहिल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. 

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये अतिरिक्त काम करू शकतात. कुटुंबात वाद होऊ शकतात. नोकरीमध्ये बदलाचे चांगले योग येतील. आर्थिक अडचणींचा सामना करू शकतो. धीराने काम घ्यावं लागणार आहेत.