6 दिवसांत 2 महत्त्वाचे ग्रह बदलणार राशी! या लोकांची होणार आर्थिक भरभराट

4 राशीच्या लोकांसाठी शुभ योग, नोकरी ते आर्थिक वृद्धी या गोष्टींमध्ये होणार मोठा फायदा

Updated: Jun 26, 2022, 03:10 PM IST
6 दिवसांत 2 महत्त्वाचे ग्रह बदलणार राशी! या लोकांची होणार आर्थिक भरभराट title=

मुंबई : मंगळ ग्रह 27 जून रोजी स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. मंगळ मेष राशीत प्रवेश करत आहे. त्याचा परिणाम काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ होणार आहे. 5 दिवसांनंतर 2 जुलै रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह साहस, पराक्रम, विवाह, संपत्तीसाठी ओळखला जातो. 

बुध ग्रह बुद्धी, व्यापार, धन आणि बोलण्याचं कौशल्य यासाठी ओळखला जातो. आता बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे याचा परिणामही इतर राशींवर होणार आहे. दोन्ही ग्रहांचा 4 राशींवर शुभ परिणाम होणार आहे. या राशींना धनलाभाचा योग आहे. 

मेष : पार्टनरच्या मदतीने कामं पूर्ण होतील आणि चांगला वेळ जाईल. कामात यश मिळेल. धनलाभ होईल. थांबलेले पैसे तुम्हाला मिळतील. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः शुभ आहे.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना हा काळ खूप लाभदायी आहे. नवीन नोकरी मिळू शकते. कामात काही बदल होऊ शकतात. टुंबात आनंदाचे वातावरण राहील. लोक तुमची प्रशंसा करतील. खरेदी करू शकता.

वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी मंगळ-बुध संक्रमण फलदायी ठरेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. राहणीमान सुधारण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.

धनु : आयुष्यात आनंदाचं वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल आणि त्याचा करिअरमध्ये फायदा होईल. नोकरी-व्यवसाय चांगला राहील. नवीन घर-कार खरेदी करू शकता.