Braham Kamal: वर्षातून एकदा रात्री फुलतं हे फूल, पाहणाऱ्याचं बदलतं नशीब

वर्षातून एकदाच फुलतं हे फूल. पाहा काय आहे मान्यता.

Updated: Sep 20, 2022, 09:21 PM IST
Braham Kamal: वर्षातून एकदा रात्री फुलतं हे फूल, पाहणाऱ्याचं बदलतं नशीब title=

मुंबई : हिंदू धर्मात अनेक फुलांचा उल्लेख आहे. यामध्ये ब्रह्मकमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. या फुलाविषयी अशी समजूत आहे की मध्यरात्री काही काळच ते फुलते. या फुलाविषयी असे म्हटले जाते की, ज्याला हे फुललेले फूल दिसते त्याचे नशीब उजळते. ब्रह्मकमळ स्वतः ब्रह्मदेवाचे फूल आहे. जे या विश्वाचे रचेता आहेत. अशी धार्मिक धारणा आहे. या फुलावर ब्रह्माजी स्वतः विराजमान आहेत आणि या फुलापासून ब्रह्माजींचा जन्म झाला असे म्हणतात.

ब्रह्मकमळ बाबत असे म्हटले जाते की, त्यावर वर्षातून एकदाच काही तास फुले येतात. या फुलाबद्दल असे मानले जाते की भगवान शंकराने ब्रह्मकमळातून गणेशाच्या विच्छेदित मेंदूवर पाणी शिंपडले होते. त्यामुळे या फुलाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. 

हे फूल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. व्यक्तीची राहिलेली कामे मार्गी लागतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊन सुख-समृद्धी येते.  ही फुले भगवान शंकराला अर्पण केल्यास ते लगेच प्रसन्न होतात. त्याच बरोबर घरामध्ये लावल्यानेही भगवान शंकराची कृपा कुटुंब आणि घर या दोन्हींवर होते. असे मानले जाते की हे फूल उमलताच भाविकांचे नशीब बदलते.

Brahma Kamal The King of Himalayan Flowers Blossoms Once in Year in  Uttarakhand, Watch Breathtaking Blooming Video

ब्रह्मकमळबद्दल असे म्हटले जाते की हे फूल घराची शोभा तर वाढवतेच पण नशीबही चमकवते. हे फूल भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. हिमालयाच्या काही भागात हे आढळते. असे म्हणतात की ज्याला ते फुललेले दिसते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.