Jyotish Tips Of Supari: हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो. हिंदू शास्त्रात सुपारीला जिवंत देवाचं स्थान प्राप्त आहे. सुपारी गणपती, देवी लक्ष्मी, ब्रह्मदेव, यमदेव, इंद्रदेव आणि वरुण देवाचं प्रतिक मानलं जातं. ग्रहशांतीत ग्रहांचं प्रतिक म्हणून सुपारी मांडली जाते. पूजा करताना पत्नी नसेल तर तिच्या जागेवर सुपारी स्थापन करून पूजेचं पूर्ण फळ मिळवलं जातं. सुपारीचं असं महत्त्व असून वास्तूदोष दूर करण्यास मदत होते. सुपारीच्या काही उपायांनी गणपती बाप्पांची कृपा मिळवू शकतो.
बातमी वाचा- Shani Dev: गाडीच्या डिक्कीत या वस्तू ठेवता? लवकर काढा अन्यथा शनिदेवांची होईल अवकृपा
पान सुपारी म्हणजेच विड्याचं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनावेळी देवांनी विड्याच्या पानाचा उपयोग केला होता. त्यामुळे मंगळ कार्यात पूजेत विड्याचा मान असतो. पान सुपारीमध्ये सकारात्मक उर्जेचा संचार असतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)