घरात वटवाघुळ दिसताच मिळतात हे संकेत; वास्तुशास्त्रानुसार काय घडतं?

Bats Arrival in House: जगभरात अनेक धारणा आहेत. काही प्राणी पक्षी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. तर काहींना अशुभ मानलं जातं. मात्र यामागचं कारण कोणालाच माहिती नसतं. अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही करू शकता. पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी संकेत देतात. 

Updated: Dec 18, 2022, 06:21 PM IST
घरात वटवाघुळ दिसताच मिळतात हे संकेत; वास्तुशास्त्रानुसार काय घडतं? title=

Bats Arrival in House: जगभरात अनेक धारणा आहेत. काही प्राणी पक्षी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. तर काहींना अशुभ मानलं जातं. मात्र यामागचं कारण कोणालाच माहिती नसतं. अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही करू शकता. पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी संकेत देतात. यामध्ये टिटवी, वटवाघूळ, कावळा, चिमणी, घुबड, कोकीळ, बहिरी ससाणा, कोंबडा आणि कबूतर या पक्षांचा समावेश आहे. वटवाघूळ घरात आल्यानं शुभ असतं की अशुभ याबाबत संभ्रम आहे. आज आपण वास्तूशास्त्रानुसार वटवाघूळ काय संकेत देतं त्याबाबत जाणून घेऊयात. 

धन हानी- घरात वटवाघुळानं प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात आल्यानं धनहानी होते आणि कर्ज वाढतं. वटवाघूळ घरात येणं आर्थिक अडचणींचे संकेत देते.

बचत- बहुतांश घरात भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी बचत केली जाते. मात्र अशा घरात वटवाघूळ आल्याने बचतीवर परिणाम होतो. काहीतरी संकट येऊन बचत संपून जाते.

बातमी वाचा- नववर्ष 2023 मध्ये 19 वर्षानंतर दुर्लभ योग, अधिक महिन्यात असा होणार परिणाम; जाणून घ्या

अशुभ- वटवाघूळ घरात येणं अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात येणं अशुभ बातमीचे संकेत असतात. घरात वटवाघूळाचा प्रवेश नकारात्मक ऊर्जेचा संचार करते. 

भांडण- वटवाघूळामुळे घरात भांडणं होतात. पती-पत्नीच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे घरातील सदस्यांच्या मनात कलह निर्माण होतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)