GajKesari Yog: बसंत पंचमीला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींची नोकरी-पैशाची गणितं सुटणार?

GajKesari Yog: बुधवारी सकाळी 10.43 पर्यंत ते मीन राशीतून मेष राशीत गेला आहे. सुमारे अडीच दिवस चंद्र या राशीत राहणार आहे. यावेळी देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 15, 2024, 07:50 AM IST
GajKesari Yog: बसंत पंचमीला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींची नोकरी-पैशाची गणितं सुटणार? title=

GajKesari Yog: देशभरात बसंत पंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. या दिवशी माता सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू ज्योतिष्य शास्त्रानुसार, हा दिवस खूप खास आहे कारण आज रवि योगासह रेवती आणि अश्विनी नक्षत्र होतं. दरम्यान या दिवशी एक खास राजयोग निर्माण झाला आहे. 

बुधवारी सकाळी 10.43 पर्यंत ते मीन राशीतून मेष राशीत गेला आहे. सुमारे अडीच दिवस चंद्र या राशीत राहणार आहे. यावेळी देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग अत्यंत शुभ मानला गेलाय. चला जाणून घेऊया या योगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकतं.

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी राजयोग तयार झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि धनात वाढ होणार आहे. समाजात मान-सन्मान मिळेल. यासोबतच नोकरीतही तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि भौतिक सुखसोयी देखील वाढतील. तुमची मेहनत आणि समर्पण पाहून वरिष्ठ अधिकारी खूप खुश होतील. शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

या योगामुळे आर्थिक इच्छा पूर्ण होऊ शकतात. दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर आता उपाय सापडू शकतो. वैवाहिक जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची व्यवसायाची विश्वासार्हताही वाढणार आहे. जर आपण विद्यार्थ्यांबद्दल बोललो तर फायदे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीमध्ये पाचव्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. सर्व कामे सहज पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. देवी-देवतांची पूजा केल्याने जोरदार लाभ मिळू शकतो. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )