Astro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...

Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची...   

Updated: Jan 3, 2023, 07:03 AM IST
Astro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...  title=
Astro Tips for Chakla Belan plpat latna rolling pin usage latest spiritual news

Vastu Tips for Chakla Belan : तुम्ही कोणतीही कामना करा, वास्तू कायम तथास्तू म्हणते असं थोरामोठ्यांकडून आपल्याला कायम सांगितलं जातं. अनेकदा त्याचा प्रत्ययही येतो. म्हणूनच वास्तू कायम आनंदी ठेवण्याकडेच अनेकांचा कल असतो. आणि का असू नये? कारण नकळतच ही वास्तू आपल्या आयुष्याला आणि आपल्या जगण्याला आकार देत असते, आपल्यासा आसका देत असते. (Vastu) वास्तूमध्ये प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली बोलकी आणि स्वत:चं वेगळं अस्तित्व जपणारी असते. यामध्ये स्वयंपाकघरही आलंच. असं म्हणतात की, स्वयंपाकघरात (Kitchen Tips) साक्षात देवी अन्नपूर्णाचा (Annapurna) वास असतो. प्रत्येक घराती गृहिणी ही तिचंच रुप मानली जाते. अन्नुपूर्णा म्हणजेच लक्ष्मीचं दुसरं रुप. त्यामुळं स्वयंपाकघरातील या लक्ष्मीची काळजी घेणं, तिला प्रसन्न करणं हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब. 

हेसुद्धा वाचा : Horoscope 3 January 2023 : या राशीच्या व्यक्तींनी ऑनलाईन खरेदी करताना काळजी!

स्वयंपाकघरातील प्रत्येक उपकरण, भांडी म्हणजे या अन्नपूर्णेची आयुधं. त्यात पोळपाट - लाटणंही आलंच. तुम्हाला माहितीये का, पोळ्या, भाकऱ्या, पुरणपोळ्या आणि अशा अनेक इतरही कामांसाठी वापरलं जाणारं हे पोळपाट लाटणं किती महत्त्वाचं आहे? चला, याविषयी जरा सविस्तर माहिती घेऊ. 

'या' रंगाचं पोळपाट- लाटणं वापरू नका 

बऱ्याच घरांमध्ये करड्या (Brown colores rolling pin) रंगाचं पोळपाट लाटणं वापरलं जातं. तर, काही घरांमध्ये दिसायला छान दिसतंय म्हणून काळ्या रंगाच्या पोळपाट लाटण्याला पसंती दिली जाते (Blach color significance). पण, ज्योतिषविद्येनुसार हे अशुभ आहे. यामुळं तुम्ही अधोगतीस जाऊ शकता. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काळ्या रंगाचं पोळपाट- लाटणं वापरल्यास शनि दोष सुरु होतो आणि घरात नकारात्मक शक्ती वास करु लागतात, ज्यामुळं घराचं स्थैर्य लयास जातं. 

पोळपाट- लाटणं धूळ खात ठेवू नका 

जेव्हा तुम्ही पोळ्या बनवाल तेव्हा लक्षात ठेवा की पोळपाट लाटणं तसंच खराब अवस्थेत, धूळ खात ठेवत नाही. असं केल्यास घरात आजारपणं वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं वापर झाल्यानंतर पोळपाट लाटणं पाण्यानं स्वच्छ करून जागच्या जागी ठेवा. 

पोळपाट- लाटण्याचा आवाज करू नका 

शास्त्रानुसार पोळपाट आणि लाटण्याचा वापर करत असताना त्याचा आवाज येता कामा नये. असं केल्यास कुटुंबाकडे धनदेवी लक्ष्मी (Godess Laxmi) पाठ फिरवते. त्यामुळं कायम पोळपाटाखाली एक सुती कापड घ्या, जेणेकरून त्यावर काहीही लाटताना आवाज होणार नाही. लाटणं वापरतानाही त्यातून आवाज येणार नाही याची काळजी घ्या. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारलेली आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)