मुंबई : Grah Gochar in September 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, बुध ग्रहांचे भ्रमण होईल. हे सर्व ग्रह निश्चित अंतराने भ्रमण करतात आणि सर्व 12 राशींवर परिणाम करतात. सप्टेंबर महिन्यातही अनेक ग्रहांचे भ्रमण होत आहे, ज्याचा राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. सप्टेंबर २०२२ मध्ये सूर्य आणि बुधाचे संक्रमण बुधादित्य योग (budhaditya yog) तयार करेल. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. याशिवाय सूर्य आणि शनी षडाष्टक योग तयार करतील जो शुभ मानला जात नाही.
बुध 2 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे याचा प्रभावही सर्व राशिंवर पडरणार आहे. बुध गोचरचा मेष, सिंह, धनु आणि कुंभ राशीवर चांगला प्रभाव दिसून येईल. त्यामुळे अन्य राशिंवर खास प्रभाव पडणार नाही.
यानंतर 15 सप्टेंबरला शुक्र ग्रह सिंह राशीत अस्त होईल. शुक्र ग्रह सुख आणि समृद्धी देणारा आहे. ते 15 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 02:29 वाजता सेट होतील. शुक्राचे संक्रमण मेष, वृषभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देऊ शकते.
यानंतर 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. सध्या सूर्य सिंह राशीत आहे आणि आता तो कन्या राशीत, बुध राशीत प्रवेश करेल. बुध आधीच स्वतःच्या राशीत आहे. त्यामुळे बुध-सूर्य एकत्र या राशीत बुधादित्य योग तयार करतील. मेष, कर्क, वृश्चिक आणि धनु राशीला सूर्याच्या राशी बदलाने चांगले दिवस येतील.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र 24 सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करेल. 24 सप्टेंबर 2022 रोजी, शनिवारी रात्री 08:51 वाजता शुक्राचे संक्रमण होईल आणि त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)