Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर

Anant Chaturdashi : यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. 

Updated: Sep 8, 2022, 09:01 AM IST
Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर  title=
Anant Chaturdashi significance and importance of anant dhaga

Anant Chaturdashi 2022: गणेश चतुर्थीला (Ganeshchaturthi 2022) गणरायाचं आगमन झालं आणि आता यथासांग पाहुणचार घेऊन लाडटका बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावाला निघणार आहेत. दरम्यानचे हे दिवस कसे क्षणात गेले याचा अंदाजही कोणाला आला नाही. पण, आता प्रत्येकजण बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज होत आहे. यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णुचीही (lord vishnu) कृपा हवी असल्यास त्यांची आराधना करा, कारण 9 सप्टेंबर (9th september 2022) हा दिवस अतिशय खास आहे. 

(Anant Chaturdashi Importance)
भाद्रपदातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंद चतुर्दशी साजरा केली जाते. या दिवशी विष्णुची पूजा करण्यासोबतच गणपतीचं विसर्जनही केलं जातं. या दिवशी विष्णुच्या अनंत रुपाची पूजा केली जाते. यानंतर अनंत्र सूत्र बांधलं जातं. यालाच अनंत धागा असंही म्हणतात. 

रेशमाच्या सूतापासून हा धागा तयार केला जातो. यामध्ये 14 गाठी लावण्याची प्रथा आहे. महिला आपल्या डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा घागा बांधतात. अशी मान्यता आहे, की हा धागा बांधल्यामुळं विष्णू भक्तांच्या सर्व अडचणी, दु:ख दूर होतात. आर्थिक पाठबळ वाढतं. 

(anant dhaga) अनंत धागा बांधताना आणि संपूर्ण पूजा करताना विष्णू सहस्त्रनामाचा जपही करणं फायद्याचं ठरतं. यामुळं कुटुंबात संतानसुख, आनंद आणि एकोपा नांदतो. 

Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीला 2 अत्यंत दुर्मिळ योग, तुम्हाला यात यश मिळेल

 (Anant Chaturdarshi 2022 Subh Muhurat)
यंदाच्या वर्षी 8 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 2 मिनिटांपासून अनंत चतुर्दशी सुरु होत आहे, ती 9 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजून  7 मिनिटांपर्यंत लागू असेल. थोडक्यात यावर्षी पुजेसाठीचा मुहूर्त 11 तास 58 मिनिटांसाठी आहे.