Akhand Samrajya Yog : 50 वर्षानंतर 3 राशींच्या कुंडलीत बनला 'डबल अखंड साम्राज्य राजयोग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, प्रतिष्ठा

Akhand Samrajya Yog : ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो, त्यावेळी अनेक वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नुकतंच सूर्याने गोचर केलं आहे आणि त्यामुळे एका योगाची निर्मिती झाली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Aug 22, 2023, 07:09 PM IST
Akhand Samrajya Yog : 50 वर्षानंतर 3 राशींच्या कुंडलीत बनला 'डबल अखंड साम्राज्य राजयोग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, प्रतिष्ठा title=

Akhand Samrajya Yog : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो, त्यावेळी अनेक वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नुकतंच सूर्याने गोचर केलं आहे आणि त्यामुळे एका योगाची निर्मिती झाली आहे. 

17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला. अशा परिस्थितीत डबल अखंड साम्राज्य राजयोग तयार झाला. नवांश कुंडलीमध्ये सूर्य उच्च अवस्थेत आला आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे. यावेळी या राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा राजयोग शुभ ठरणार आहे. 

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याच्या संक्रमणामुळे डबल अखंड साम्राज्य राजयोग तयार झाला. हा राजयोग जो मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. या स्थितीत तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. तसंच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या ध्यैर्य आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. तुमचे कोणत्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. 

कर्क रास

डबल अखंड साम्राज्याची राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. कुटुंबातील वातावरण चांगलं राहणार आहे. मुलांकडून अपेक्षित कामगिरी होणार आहे. 

तूळ रास 

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ आणि लाभदायक असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या मनाजोग्या होणार आहेत.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )