Surya-Rahu: 18 वर्षांनी सूर्य-राहू बनवणार ग्रहण योग; 'या' राशींची होऊ शकते धनहानी

Surya And Rahu Ki Yuti: 14 मार्च रोजी मीन राशीत राहू आणि सूर्याचा युती होणार आहे, त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग तयार होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 5, 2024, 09:05 AM IST
Surya-Rahu: 18 वर्षांनी सूर्य-राहू बनवणार ग्रहण योग; 'या' राशींची होऊ शकते धनहानी title=

Surya And Rahu Ki Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यावेळी एकाच राशीत दोन ग्रहांची युती होते. अनेकदा ही युती शुभ असते तर काही वेळा अशुभ देखील ठरते. 

याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येत आहे.14 मार्च रोजी मीन राशीत राहू आणि सूर्याचा युती होणार आहे, त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग तयार होणार आहे. अशा स्थितीत या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या काळात काही राशींना आर्थिक नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूचा संयोग विपरीत ठरू शकतो. या काळात तुम्हाला काही अनावश्यक खर्चाला सामोरं जावे लागू शकते. तुम्हाला खोट्या आरोपांनाही सामोरे जावे लागू शकते. विवाहित लोकांना यावेळी वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. विचारपूर्वक भागीदारी व्यवसाय करा. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे निर्माण झालेला ग्रहण दोष सिंह राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. कोणतेही मोठे नवीन व्यावसायिक सौदे करू नका. नवीन काम सुरू करणे टाळा. तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Tula Zodiac)

सूर्य आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या दिवसांत तुम्हाला शत्रूंची भीती वाटू शकते. तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. गुप्त शत्रू वर्चस्व गाजवू शकतात. हृदयरोग्यांनी या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनावश्यक कामात पैसा खर्च होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)