Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 'या' राशींसाठी बंपर लाभांचा

Aditya mangal Rajyog : मंगळ धनु राशीत गोचर केलंय. मंगळ गोचरमुळे आदित्य मंगळ राजयोग तयार झाला आहे. त्यातून 5 राशींच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे. नवीन वर्षाती सुरुवात या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Dec 27, 2023, 10:14 AM IST
Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 'या' राशींसाठी बंपर लाभांचा title=
Aditya Mangal Rajyog will be formed by Sun Mars alliance year 2024 will bring huge benefits for these zodiac signs

Aditya Mangal Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असून क्रूर ग्रह मानला जातो. आज 27 डिसेंबर 2023 ला मंगळ ग्रह (Mars Transit 2023)  धनु राशीत प्रवेश केलाय. धनु राशीत पूर्वीपासू ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. अशात मंगळ (Mangal Gochar 2023) आणि सूर्याच्या संयोगामुळे आदित्य मंगळ राजयोग निर्माण झालाय. आदित्य मंगळ राजयोगाच्या प्रभावामुळे जानेवारी 2024 च्या सुरुवातीला 5 राशींना धन, संपत्तीमध्ये दुप्पटीने लाभ होणार आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (Aditya Mangal Rajyog will be formed by Sun Mars alliance year 2024 will bring huge benefits for these zodiac signs)

मिथुन रास (Gemini Zodiac)

मंगळ ग्रहाचं संक्रमणामुळे तयार झालेल्या आदित्य मंगळ राजयोग मिथुन राशीच्या लोकांना लाभदायक असणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार आहेत. या काळात मंगळ तुमच्या दशम भावात असणार आहे. मंगळ तुमच्या करिअरमध्ये लक्षणीय सुधारणा करणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे. आर्थिक स्थिती अचानक सुधारणार असून धनलाभ होणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

आदित्य मंगळ राजयोगाचा सिंह राशीला फायदा होणार आहे. मंगळाच्या संक्रमणामुळे तंत्रज्ञान किंवा अभियांत्रिकीशी संबंधित सिंह राशीच्या लोकांना हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुमचं भाऊ-बहीण तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. मंगळाच्या भ्रमणामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

मंगळ ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा तूळ राशीच्या लोकांच्या जीवनावर फार चांगला प्रभाव पडणार आहे. तुम्हाला भावंडाचं सहकार्य लाभणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय अनुकूल असणार आहे. वडील, शिक्षक यांचं सहकार्य मिळणार आहे. धन-संपत्तीच्या बाबतीत लाभदायक काळ असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

मंगळाचं संक्रमण धनु राशीसाठी चांगले दिवस आणणार आहे. यावेळी तुम्हाला अनेक प्रेम प्रस्ताव येणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी कानावर पडणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे. अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ खूप चांगला असणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac) 

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचं संक्रमण करिअरसंबंधी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना यश देणार आहे. तुम्हाला इच्छित ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या काळात तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावं लागेल, प्रवास सुखकर होणार आहे. तुम्हाला मालमत्ता लाभणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )