Todays Panchang : आज विनायक चतुर्थी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त

Aaj Ch Panchang 25 March 2023: पंचांगानुसार आज चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते, जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त... 

Updated: Mar 25, 2023, 07:42 AM IST
Todays Panchang : आज विनायक चतुर्थी, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त  title=

Today Panchang, 25 March 2023: कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे (Vinayak Chaturthi 2023) व्रत केले जाते. आज चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले असल्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी चतुर्थीचे उपवास आणि त्यांच्या आवडत्या गोष्टींना विशेष प्राधान्य देण्यात येते. अशा स्थितीत जर तुम्हीही एखाद्या शुभ मुहूर्तावर श्रीगणेश किंवा देवीची पूजा केली तर तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. पंचांगनुसार या दिवसाच्या शुभ आणि अशुभ वेळेबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. राहुकाल, अदल योग, विदल योग, गुलिक काल, वर्ज्य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा इत्यादी अशुभ योग महत्वाच्या कामांचे वेळापत्रक बनवताना पाळावेत आणि टाळावेत. भाद्रा देखील विशेष अशुभ मानली जाते.

आजचा वार: शनिवार

आजचा पक्ष : शुक्ल पक्ष
 
सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताच्या वेळा

सूर्योदयाची वेळ : सकाळी 06:20 
सूर्यास्ताची वेळ: संध्याकाळी 06:35
चंद्रोदयाची वेळ: रात्री 08:31
चंद्रास्त वेळ : सकाळी 10:30

आजचा शुभ काळ

अभिजित मुहूर्त - दुपारी 12:03 ते 12:52 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते 03:19 पर्यंत 

आजची अशुभ वेळ 

दुर्मुहूर्त - सकाळी 06:20 ते सकाळी 07:09  आणि सकाळी 07:09 सकाळी 07:58 पर्यंत 
राहुकाल - सकाळी 09:24 ते 10:55 पर्यंत 
गुलिक काल - सकाळी 06:20 ते 07:52 पर्यंत 
यमगंड - दुपारी 01:59 ते दुपारी 03:31 पर्यंत 

 

 

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)