New Nostradamus Prediction : ज्योतिष जगाने हे अख्ख जग काबीज केलं आहे. या क्षेत्रात करोडो, अब्जावधीचं उद्योग निर्माण केला आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्द जाणून घ्यायचं असतं. 500 वर्षे जुन्या ज्योतिषांच्या हस्तलिखितांच्या अनुवादापासून ते आजच्या आधुनिक म्हणजेच नवीन नॉस्ट्रॅडॅमसची मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सोशल मीडियामुळे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात वाव सोबत मागणी वाढली आहे. आजकाल मानसिक नॉस्ट्रॅडॅमसची मोठी चर्चा असून त्यांनी 2024 साठी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. हे नवीन ज्योतिष बाबा कोण आहेत? आणि त्यांनी काय भविष्यवाणी केली आहे जाणून घ्या. (2024 Major Earthquake Will Destroy Major Cities New Nostradamus craig hamilton parker Scary Predictions )
हे नवीन नॉस्ट्राडेमस सर्वाधिक चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीवर जग विश्वास ठेवतात. बाबा वेंगानंतर जगातील नावाजलेले नॉस्ट्राडेमस अशी त्यांची ओळख होते आहे. त्याने जर्मनी आणि ब्रिटनसाठी अनेक भाकित केले आहेत. जर्मनीत हिटलरच्या सत्तेचा उदय आणि राणी एलिझाबेथच्या मृत्यूचं भाकीत त्यांचं तंतोतंत खरं ठरलं होतं. आता नवीन नॉस्ट्रॅडॅमस नावाच्या मानसशास्त्रज्ञाने 2024 बद्दल भीतीदायक भविष्यवाणी केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
नवीन नॉस्ट्रॅडॅमस क्रेग हॅमिल्टन पार्करने त्याच्या यूट्यूब चॅनेल 'कॉफी विथ क्रेग' वर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी धक्कादायक आणि भीतीदायक भाकित केलं आहे. त्यांचा इशारा हा अमेरिकेसाठी आहे.
क्रेग हॅमिल्टन पार्कर यांच्या भाकीतानुसार, पुढील वर्षी 2024 मध्ये अमेरीकेवर वीज संकट कोसळणार आहे असा इशारा दिला आहे. त्यामुळे काही देशात अंधारात बुडणार आहे. कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये, तीव्र वादळ किंवा प्रचंड चक्रीवादळमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बत्तीगुल होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये, वीज पुरवठा पायाभूत सुविधांचा नाश होणार असून संपूर्ण ब्लॅकआउटची भाकित करण्यात आलं आहे. 2024 मध्ये अमेरिकेत फार मोठे भूकंप होणार असून शहराचे मोठं नुकसान होणार आहे.
यापूर्वी, बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी 2024 ची भविष्यवाणी करून जगाला घाबरवले होतं. त्यांनी सर्वात मोठा इशारा रशियाला दिला होता. रशियन पुतिन यांच्या हत्येचा कट रचत असल्याची भाकीत केलं आहे.
अमेरिकेतील गृहयुद्ध : नॉस्ट्राडेमसने अमेरिकेतील गृहयुद्धाबद्दलही भाकीत केलं होतं. पुढील वर्षी अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यात वादविवादामुळे मोठं वादळ येणार आहे.
चीनवर कोसळणार संकट : चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी घडणार आहेत. तैवानबाबत दोघेही समोरासमोर येणार आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेचे युद्धात रूपांतर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 2024 साठी नॉस्ट्रॅडॅमसचे भाकीत असं की, 'लाल शत्रू भीतीने पिवळा होईल, महासागरात भीती असणार आहे.' नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवणारे म्हणतात की लाल शत्रू चीन आहे. तर, महान महासागर म्हणजे हिंदी महासागर आहेत.
भयानक वादळे आणि पूर : नॉस्ट्राडेमसने 2024 मध्ये हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख देखील केला आहे. 'कोरडी जमीन आणखी कोरडी होईल आणि अनेक देशांमध्ये पूर येणार आहेत.'