Pitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा

Pitru Paksha 2024 Date : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Sep 13, 2024, 03:28 PM IST
Pitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा title=
17th or 18th September when Pitru Paksha 2024 Date due to lunar eclipse Know the dates of Shraddha according to Tithi

Pitru Paksha 2024 Date : हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवाड्याला अतिशय महत्त्व आहे. कारण शास्त्रानुसार पितृपक्षात पूर्वज पृथ्वीतलावर येतात, अशी मान्यता आहे. पितृ पंधरवड्यात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानला अतिशय महत्त्व आहे. पितृदोष मुक्तीसाठीही विधी केले जातात. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या. 

पितृ पक्ष 2024 तारीख (Pitru Paksha 2024 Date)

पितृ पक्ष भाद्रपद महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहतो. पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. 2 ऑक्टोबर 2024 रोजी असणार आहे. पण पंचागानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते. पण यंदा यादिवशी श्राद्ध तिथी नसणार आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष विधीला सुरुवात होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2024 : पितृपक्षावर चंद्र आणि सूर्यग्रहणाची सावली, पितरं श्राद्ध स्वीकार करतील का? ज्योतिषाकडून जाणून घ्या ग्रहण शुभ की अशुभ

श्राद्धाच्या तिथी

17 सप्टेंबर- मंगळवार पौर्णिमा श्राद्ध
18 सप्टेंबर - बुधवार प्रतिपदा तिथी (पितृपक्षाला सुरूवात )
19 सप्टेंबर- गुरुवार द्वितीया तिथी
20 सप्टेंबर - शुक्रवार तृतीया तिथी
21 सप्टेंबर- शनिवार चतुर्थी तिथी
22 सप्टेंबर- सोमवार पंचमी तिथी
23 सप्टेंबर- सोमवार षष्ठी आणि सप्तमी तिथी
24 सप्टेंबर - मंगळवार अष्टमी तिथी
25 सप्टेंबर- बुधवार नवमी तिथी
26 सप्टेंबर- गुरुवार दशमी तिथी
27 सप्टेंबर- शुक्रवार एकादशी तिथी
28 सप्टेंबर- रविवार द्वादशी तिथी
30 सप्टेंबर- सोमवार त्रयोदशी तिथी
1 ऑक्टोबर- मंगळवार चतुर्दशी तिथी
2 ऑक्टोबर- बुधवार सर्व पितृ अमावस्या

हेसुद्धा वाचा - गणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ?

हिंदू शास्त्रानुसार पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत उत्तम काळ मानला जातो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)