1/11
बॉलिवूडमधील या ताऱ्यांनी घेतला निरोप... देवेन वर्मा : ज्येष्ठ हास्य अभिनेते देवेन वर्मा यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. सदाशिव अमरापूरकर : हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे मराठमोळे अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी ३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा २.४५ वाजता जगाचा निरोप घेतला. मृत्यूसमयी ते ६४ वर्षांचे होते. रवी चोप्रा : 'महाभारत' ही ऐतिहासिक मालिका दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं मुंबईमध्ये निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. उपालापू श्रीनिवास : मँन्डोलिन श्रीनिवास म्हणून ओळखळे जाणारे उपालापू श्रीनिवास यांचं १९ सप्टेंबर रोजी दीर्घकाळ आजारानं निधन झालं. अरुण दत्त : दिवंगत सिनेनिर्माते गुरु दत्त यांचा मुलगा अरुण दत्ता यांनी पुण्यात २६ जुलै रोजी आपले प्राण सोडले. झोहरा सैगल : ज्येष्ठ अभिनेत्री झोहरा सैगल यानी नवी दिल्ली इथं १० जुलै रोजी मॅक्स हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या १०२ वर्षांच्या होत्या. नंदा : ज्येष्ठ अभिनेत्री नंदा यांनी २५ मार्च रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. सितारा देवी : प्रसिद्ध कथ्थक नर्तकी सितारा देवी यांनी २५ नोव्हेंर रोजी या जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या जसलोक हॉस्पीटलमध्ये त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्या ९४ वर्षांच्या होत्या.
2/11
कायद्यात अडकलेले बॉलिवूड चित्रपट... पीके : आमिर खानच्या बहुचर्चित 'पीके' या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं. चित्रपट प्रदर्शनाआधी तब्बल पाच महिने हे पोस्टर जाहीर झालं होतं. आमिर खानच्या 'न्यूड फोटो'मुळे हे पोस्टर भलतंच चर्चिलं गेलं. या फोटोला क्लीनचीट मिळण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली. गुलाब गँग : 'गुलाब गँग' या राजकीय पक्षाच्या खऱ्या कर्त्या-धर्त्या संपत पाल यांनी माधुरी दीक्षित फेम 'गुलाब गँग' या चित्रपटावर आक्षेप घेतला. आपल्याच जीवनावर आपल्याच परवानगीवर चित्रपट बनवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं सांगत, संपत पाल यांनी चित्रपट निर्मात्यांना कोर्टात खेचलं. रंग रसिया : चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्येच सहा वर्ष पडून राहिलेला सिनेमा 'रंग रसिया'चं काम पूर्ण झालं... पण, त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं मात्र या सिनेमातील अश्लील आणि बोल्ड दृश्यांना आक्षेप घेतला.
3/11
आपटलेले चित्रपट... - या वर्षात प्रेक्षकांचा सर्वात मोठा अपेक्षाभंग कुणी केला असेल तर तो आहे सुभाष घई यांचा कमबॅक सिनेमा 'कांची'नं... - सलमानचा 'जय हो'नं चांगलाच गल्ला जमवला असला तरी तो सिनेमा सलमानच्या पात्रतेचा नव्हता, असंच प्रेक्षकांना जाणवलं. - 'क्वीन' या सिनेमात कंगनाच्या अभिनयाला चांगलीच दाद मिळाली असली तरी तिचा आणखी एक सिनेमा 'रिव्हॉल्व्हर रानी' फ्लॉप ठरला. - या वर्षात विद्या बालन हिचे 'शादी के साईड इफेक्ट' आणि 'बॉबी जासूस' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले... तरी, प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मात्र तिला यंदा मिळाला नाही. - माधुरी दीक्षितनं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत 'गुलाब गँग' आणि 'देढ इश्किया'ची हवा तयार केली... पण, व्यर्थ...
4/11
सेलिब्रिटिज आणि वादग्रस्त प्रकरणं... - श्वेता बासू : 'मकडी' फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद अनेक बातम्यांच्या मथळ्यात झळकली. एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणात तिचं नाव आलं. या प्रकरणावरून ती दोन महिने सुधारगृहातही होती. त्यानंतर मात्र श्वेताला हैदराबाद कोर्टाकडून या प्रकरणात क्लिन चीट मिळाली. - ममता कुलकर्णी : बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावरून अचानक गायब झालेली एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला तिचा बॉयफ्रेंड विकी गोस्वामीसह केनियात अटक करण्यात आली. ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली. यापूर्वीही ममता धर्मांतराच्या आणि साध्वी बनल्याच्या अफवांमुळे चर्चेत आली होती. - विना मलिक : पाकिस्तानचा सर्वांत मोठा मीडिया ग्रुप म्हणून ओळखल्या जाणारी 'जिओ टीव्ही'चा मालक शकील उर रहमानसह अभिनेत्री वीणा मलिक आणि तिचा पती यांना कोर्टानं २६ वर्षांची शिक्षा सुनावलीय. 'जियो टीव्ही'वर दाखवण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह कार्यक्रमात एक धार्मिक गाणं प्रसारित करण्यात आलं होतं. या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली.
5/11
गौहर खानला थोबाडीत एकेकळाची सुपर मॉडेल आणि आत्ता अभिनेत्री म्हणून समोर येणारी 'बिग बॉस सीझन ७'ची विजेती गौहर खान हिला एका कार्यक्रमादरम्यान एका तरुणानं सर्वांदेखत थोबाडीत मारली. 'इंडियाज रॉक स्टार' या कार्यक्रमाचं होस्टिंग करत असताना गौहरसोबत ही घटना घडली. गौहर तोकडे कपडे घालते, म्हणून आपण हे कृत्य केल्याचं स्पष्टीकरण त्यानं दिलं. स्वत:ला 'नैतिकतेचा ठेकेदार' म्हणवून घेणाऱ्या या तरुणाला सोशल मीडियावर नेटीझन्सनं चांगलंच फैलावर घेतलं.
6/11
दीपिका पादूकोण क्लिव्हरेज वाद... एका नावाजलेल्या वर्तमानपत्रानं एक अभिनेत्री दीपिका पादूकोण हिचा एक जुना व्हिडिओ नव्या आणि एका अश्लील हेडलाईनसह पुन्हा शेअर केला आणि हा वादंग उभा राहिला. 'क्लिव्हरेज' प्रकरणावर दीपिका चांगलीच भडकली. तिनं सोशल वेबसाईटवरच या वर्तमानपत्राला फैलावर घेतलं... यामध्ये, दीपिकाला सहअभिनेते - अभिनेत्री यांच्यासहीत तिच्या फॅन्सचाही भरपूर पाठिंबा मिळाला.
7/11
तुटलेल्या जोड्या... - पूजा भट्ट आणि मनिषा मखिजा यांनी आपलं ११ वर्षांचं लग्न संपुष्टात आणण्याचा आपला निर्णय जाहीर केला. अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट हिनं मनिषशी १९९७ साली लग्नगाठ बांधली होती. - बिग बॉस सीझन-७ चं ‘तन-मन’ म्हणजेच तनिषा मुखर्जी आणि अरमान यांनीही आपलं रिलेशनशीप संपुष्टात आल्याचं सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं. - बिग बॉस सीझन-७चं आणखी एक कपल म्हणजेच गौहर खान आणि कुशाल टंडन... कार्यक्रमात जुळलेलं या दोघांचं सूत वर्षभर टीकलं... पण, नुकतंच या दोघांनीही आपले मार्ग वेगळे झाल्याचं जाहीर केलं. - पत्नी श्रद्धा निगन हिच्यापासून वेगळं होऊन जेनिफर विंगेटसोबत पुन्हा बोहल्यावर चढलेल्या करण सिंग ग्रोवरसाठी हे वर्ष खडतरच राहीलं... नुकतंच, त्याचं आणि जेनिफरनंही आपण एकमेकांपासून वेगळं झाल्याचं स्पष्ट केलंय. - सिनेनिर्माता प्रियदर्शन आणि त्याची पत्नी लिझी यांनी आपल्य २४ वर्षांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. लिझीनं १ डिसेंबर २०१४ रोजी चेन्नई कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज सादर केला.
8/11
हृतिक – सुझानचे वेगळे झाले मार्ग एकेकाळी आदर्श म्हणून ओळखलं जाणारं जोडपं हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोटाचा अर्ज वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं ३१ ऑक्टोबर रोजी मान्य केला... आणि बॉलिवूडच्या हे एकेकाळचं गोड जोडपं एकमेकांपासून वेगळं झालं. डिसेंबर २०१३ मध्ये हृतिक-सुझानमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं उघड झालं होतं.
9/11
10/11