1/11
2/11
रोहित शेट्टी
हिंदी सिनेमांचा 'स्टंट मॅन'चा मुलगा रोहित शेट्टीनं लहानपणापासून अनेक अडचणींचा सामना केलाय. आज तो एक प्रथितयश डायरेक्टर म्हणून गणला जात असला तरी रोहितला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही.
कुकू कोहलीला एका सिनेमासाठी असिस्ट करण्यासाठी रोहितला त्याचा पहिला पगार मिळाला होता. तेव्हा तो केवळ 16 वर्षांचा होता. रोज 35 रुपये त्याचा पगार होता. हा त्याचा पगार म्हणजे त्याचा रोजच्या येण्या-जाण्याचा खर्च होता.
3/11
इम्रान हाश्मी
इम्रान हाश्मी हादेखील एका फिल्मी कुटुंबातून आहे, हे फारच कमी लोकांना माहित असेल. सिनेनिर्माते महेश भट्ट हे इम्रानचे मामा...
बॉलिवूडच्या या सीरियल किसरला वयाच्या सातव्या वर्षीच कमाईची संधी मिळाली होती. 'गुड नाईट'च्या एका जाहीरातीसाठी इम्रानला निवडलं गेलं होतं. यासाठी त्याला 2500 रुपयांचा चेक मिळाला होता.
4/11
प्रियांका चोप्रा
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि स्वत:च्या हिंमतीवर 'मिस वर्ल्ड'चा खिताब मिळवणाऱ्या प्रियांका चोप्राला पैशांची 'किंमत' चांगलीच ठाऊक आहे.
प्रियांकानं पहिल्या पगारामध्ये पाच हजार रुपये मिळाले होते... हे पैसे तिनं आजपर्यंत खर्च केलेले नाहीत.
हे पैसे प्रियांकानं आपल्या आईच्या हातात दिले होते. तिच्या आईनं ते आजपर्यंत सांभाळून ठेवलेत.
5/11
जॉन अब्राहम
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार होता 11,800 रुपये... त्याच्या 'बँक ऑफ महाराष्ट्र' अकाऊंटमध्ये त्याचा हा पगार जमा करण्यात आला होता. त्यामुळे, जॉन अजुनही आपल्या या अकाऊंटमध्ये आपल्या पहिल्या पगाराइतका बॅलन्स राहील याची काळजी घेतो. पैसे वाचवण्यासाठी आपण रिक्षातून प्रवास केल्याचंही जॉन म्हणतो.
6/11
ऋतिक रोशन
फिल्मी कुटुंबातील असूनही ऋतिकलाही आपल्या पहिल्या पगाराचं आजही अप्रुप वाटतं...
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन ऋतिकलाही हिरो बनण्याची इच्छा होती. 1980 साली आलेल्या 'आशा' या सिनेमात ऋतिकनं बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. यावेळी, तो केवळ 6 वर्षांचा होता. या भूमिकेसाठी त्याला 100 मिळाले होते. हे सगळे पैसे ऋतिकनं आपल्यासाठी खेळणी घेण्यासाठी वापरले.
7/11
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी... खऱ्याखुऱ्या आयुष्यातही त्याचा खिलाडूपणा दिसून येतो. जेवण बनविण्याची त्याची आवड आत्तापर्यंत लपून राहिलेली नाही. पण, याच कलेतून त्याला त्याचा पहिला पगार मिळाला होता.
अक्षय बँकॉकच्या मेट्रो गेस्ट हाऊसमध्ये शेफ आणि वेटर म्हणून काम करत होता. इथं त्याचा महिन्याचा पगार भारतीय चलनाप्रमाणे जवळपास 1500 रुपये होता.
8/11
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचे आज देशातच नाही तर परदेशातही लाखो फॅन्स आहेत. मोठ-मोठ्या लग्जरी गाड्यांमध्ये फिरणं, परदेश दौरे, ब्रांडेड कपडे अशी त्याची लाईफस्टाईल कुणालाही हेवा वाटण्याजोगी...
पण, याच शाहरुखनं आपली ओळख बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीय. शाहरुखला मिळालेला पहिला पगार होता 'एन्ट्री किपर' म्हणून काम करण्यासाठी... दिल्लीमध्ये गायक पंकज उदास यांच्या एका कॉन्सर्टमध्ये दरवाजात उभं राहण्यासाठी त्याला 50 रुपये मिळाले होते. या पैशांतून शाहरुख ताजमहल पाहण्यासाठी आग्र्यात गेला होता.
9/11
धर्मेंद्र
हिंदी सिनेमाचा 'हि-मॅन' म्हणून ओळखला जाणारा धर्मेंद्रही काही जन्मापासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आला नव्हता. तो एका सामान्य शीख कुटुंबातून आहे. धर्मेंद्रचे वडिल लुधियानाच्या एका गावातील शाळेत हेड मास्तर म्हणून काम करत होते.
1960 साली धर्मेंद्रला त्याचा पहिला सिनेमा 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमासाठी केवळ 51 रुपये मानधन म्हणून मिळाले होते. ही त्याची पहिलीच कमाई होती. यानंतर त्याला अनेक सिनेमांत साईड रोल मिळाले होते.
10/11