1/13
2/13
स्पा, ब्युटी पार्लर आणि जीमही..
डेक्कन ओडिसीत एक स्पा कोचही आहे. ज्यामध्ये महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळ्या अशा दोन मसाज रूम आहेत, जिथं प्रवास करत असतानाच पर्यटकांना मसाज करून घेता येतो. स्पा कोचमध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लरचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच इथं एक छोटी जीमही आहे. रोज जिममध्ये जाणाऱ्यांच्या व्यायामात खंड पडू नये याची तजवीज इथं करण्यात आलीय. जीम फ्री असली तरी मसाज आणि ब्यूटी पार्लरसाठी मात्र वेगळे पैसे मोजावे लागतात. डेक्कन ओडिसीत पंख नावाचा कॉन्फरन्स हॉल आहे... इथं टाईमपाससाठी भरपूर काही आहे.
3/13
4/13
चालत्या ट्रेनमध्ये आणि तेही पचतारांकीत रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूचा निसर्ग पाहत जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा केवळ डेक्कन ओडिसीमध्येच मिळू शकते... प्रवासामध्ये जास्त खाल्याने त्रास होईल ही भिती डेक्कन ओडिसीमध्ये नसते. कारण हे पदार्थ बनवण्यासाठी सर्वोत्तम साहित्य निवडले जाते. तसंच पदार्थ बनवताना, सर्व्ह करताना हायजिनची काळजी घेतली जाते. संपूर्ण प्रवासादरम्यान पर्यटकांना बॉटलबंद पाणी दिले जाते.
5/13
ऐषोरामी अशा या दोन्ही रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट अत्यंत सुंदररित्या करण्यात आली असून इथं बसून नाश्ता, जेवण करत गप्पा मारण्याचा फिल काही वेगळाच आहे. प्रवासादरम्यान तुमचा सर्वाधिक वेळ हा तुमच्या रूमनंतर रेस्टॉरंटमध्येच जात असल्यानं अधिकाधिक पदार्थांची चव चाखण्याची संधी तुम्हाला इथं मिळते आणि त्यासाठी तु्म्हाला पैसे द्यावे लागत नाहीत. महाराष्ट्रायीन पदार्थांबरोबरच राजस्थानी, साऊथ इंडियन डिशेस, युरोपीयन, इटालियन, फ्रेंच, थाई अशा विविध पद्धतींच्या डिशेस रेस्टॉरंटमध्ये मिळतात. परंतु बहुतांश परदेशी पर्यटक भारतीय पदार्थांवरच ताव मारताना दिसतात.
6/13
7/13
सुखदायक प्रवासाबरोबरच लज्जतदार जेवणाचा आस्वाद ही डेक्कन ओडिसीतील पर्यटकांसाठी दुहेरी पर्वणीच आहे. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत देश विदेशातील विविध पदार्थांची अस्सल चव चाखायला इथं मिळते. परंतु यातील एकही पदार्थ दुसऱ्या दिवशी रिपीट केला जात नाही, रोज वेगळ्या पदार्थांची मेजवानी पर्यटकांना दिली जाते.
8/13
डेक्कन ओडिसीतील दोन कोचमध्ये चार प्रेसिडेन्शियल रूमही आहेत. डिलक्स आणि प्रेसिडेन्शियल धरून 88 पर्यटकांची राहण्याची आणि प्रवासाची सोय इथं आहे. तर तुमच्या दिमतीला डेक्कन ओडिसीचा चाळीसभर जणांचा स्टाफ असतो, जो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. डेक्कन ओडिसीमध्यच पंचतारांकीत हॉटेलमधील रेस्टॉरंटलाही लाजवेल अशी दोन रेस्टॉरंट असून इथं तब्बल 68 जणांची बसण्याची व्यवस्था आहे.
9/13
या कोचना दिलेली नावेही राज्यातील संस्कृतीची ओळख करून देणारी अशीच आहेत. वारी, अभंग, तीर्थ, गुंफा अशी डिलक्स कोचची नावे आहेत. एखाद्या चांगल्या हॉटेलमधील रूममध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा इथं आहेत. वाय-फायपासून टीव्हीपर्यंत आणि बाथरूममधील गरम पाण्यापासून तुमच्या दिमतीला असणाऱ्या अटेंडंटपर्यंत... तुमच्या गरजा ओळखून सर्वकाही तुमच्या रूममध्ये देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
10/13
11/13
प्लॅटफॉर्मवर उभी असलेली डेक्कन ओडिसी तुमच्यासाठी सज्ज असते, परंतु आत जाण्यापूर्वी तिचे बाह्यदर्शन तुम्हाला रोखून धरते. प्रत्येक कोचवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी वारली पेंटींग्ज अत्यंत सुबक पद्धतीने रेखाटली गेलीत. प्रत्येक कोचच्या नावाला साजेशी अशी राज्यातील पर्यटन स्थळे, मंदिरे, कला, संस्कृती याचे प्रतिबिंब या चित्रांतून दिसते. यानंतर सुरू होतो चाकांवरच्या पंचतारांकीत हॉटेलमधून शाही प्रवास.
12/13