फक्त २३ वर्ष जगलेल्या भगतसिंहांबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

Sep 28, 2015, 18:53 PM IST
1/12

१२) भगत सिंह यांच्या ट्रायल दरम्यान त्यांच्या वडिलांनी भगत सिंह यांच्या बचावाचा प्लान केला होता. यावर भगत सिंह नाराज झाले होते, त्यांनी यावर म्हटलंय, मी असं काहीही चुकीचं केलं नव्हतं, ज्यामुळे माझ्या आईवडिलांवर माफी मागण्याची वेळ यावी.

2/12

११) आस्तिकता आणि नास्तिकता यावरून, जेलमध्ये भगत सिंह यांचा आपल्या मित्राशी वाद झाला होता. नास्तिकता यावर भगत सिंह यांनी पुस्तक लिहिलं होतं,

११) आस्तिकता आणि नास्तिकता यावरून, जेलमध्ये भगत सिंह यांचा आपल्या मित्राशी वाद झाला होता. नास्तिकता यावर भगत सिंह यांनी पुस्तक लिहिलं होतं, "मी नास्तिक का आहे."

3/12

१०) १९३० साली जेलमध्ये राहिल्यानंतर भगत सिंह यांनी आपल्यासह साथीदार कैद्यांना 'पॉलिटकल प्रिजनर' (राजकीय कैदी) नावाचा शब्द दिला. यावरून त्यांनी कैद्यांना विविध सुविधांची मागणी केली.

4/12

९) सेंट्रल असेंबलीत भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांनी बॉम्ब फेकले, ते अतिशय कमी स्फोटकं वापरून बनवण्यात आले होते, कारण त्यांना कुणालाही मारायचं नव्हतं, तर संदेश द्यायचा होता. इंग्रज अधिकाऱ्यांच्या चौकशीत तसेच फॉरेन्सिक रिपोर्टमध्येही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला होता.

5/12

८) जालियनवाला बाग हत्याकांड घडलं तेव्हा भगत याचं वय १२ वर्ष होतं. हत्याकांडनंतर भगत हे जालियनवाला बागेत गेले, त्यांनी रक्ताने माखलेली माती एका बाटलीत भरली आणि त्याची ते पूजा करत होते. भगत सिंह नेहमी म्हणायचे इंग्रज त्यांना मारू शकतात, पण त्यांच्या विचारांना नाही. हे वाक्य क्रांतीकारींसाठी दिशादर्शक ठरलं.

6/12

७) भगत सिंह यांना लग्न करायचं नव्हतं, जेव्हा त्यांचे आई-वडिल त्यांच्या लग्नासाठी स्थळं पाहत होते, तेव्हा ते घर सोडून कानपूरला आले, त्यांनी म्हटलं होतं, की मी ज्या रस्त्यावर आहे, तेथे मृत्यू फक्त माझी वधू होऊ शकते.

7/12

६) भगत सिंह एक चांगले लेखक होते, त्यांनी उर्दू आणि पंजाबी न्यूज पेपर्समध्ये भरपूर लिखाण केलं, हे न्यूज पेपर्स अमृतसरहून प्रकाशित होत होते. छायाचित्रात भगत सिह शहीद झाले त्या दिवसाची बातमी.

8/12

५) भगत सिंह शीख धर्मीय होते, त्यांना लाहौरहून भूमिगत व्हायचं होतं, ते कोलकात्याला जाणार होते. त्यासाठी त्यांची पगडी आणि दाढी पाहून त्यांची ओळख होईल, असं त्यांना वाटलं होतं, अशी कोणतीही ओळख पटू नये, म्हणून त्यांनी पगडी आणि दाढी काढून टाकली होती, असंही म्हटलं जातं की मार्क्स आणि लेनीनला वाचून आणि हिंदू-मुसलमानांची भांडणं पाहून त्यांचं धर्मावरील मन उडून गेलं होतं, भगत सिंह स्वत:ला नास्तिक म्हणत होते.

9/12

४) भगत सिंह यांना फाशी देण्यात येणार होती. यासाठी एक ऑब्जर्वर हवा होता, या भूमिकेसाठी कुणीही तयार नव्हतं, वास्तविक डेथ वॉरंट रद्द झाल्यानंतर मृत्यूची शिक्षा सुनावणाऱ्या जजनेच भगतसिंह यांच्या फाशीसाठी, ऑब्जर्वरची भूमिका पार पाडली.

10/12

३) भगत सिंह यांच्यात एक चांगला कलाकार होता. त्यांनी आपल्या कॉलेज जीवनात अनेक नाटकांमध्ये भाग घेतला, त्यात सर्वात चर्चेत राहिलेलं नाटक 'राणा प्रताप' 'सम्राट चंद्रगुप्त' 'भारत दुर्दशा'.

11/12

२) भगत सिंह यांनी आपल्या शेवटच्या पिटीशनमध्ये इंग्रज सरकारला लिहिलं होतं, तुमच्या न्यायालयाचा निर्णय असा आहे की, आम्ही ब्रिटनविरोधात युद्ध छेडलं आहे. जर असं असेल तर आम्ही युद्धबंदी आहोत, आणि युद्धबंदींना जी शिक्षा दिली जाते ती आम्हाला द्या, आम्हाला फाशीवर लटकवण्याऐवजी, बंदुकीच्या गोळ्यांनी आमच्या शरीराची चाळणी करून टाका.

12/12

१) आज शहीद भगतसिंह यांचा जन्मदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यात भगतसिंह यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि प्रेरणादायी आहे. भगतसिंह यांचा तेजस्वी इतिहास तरूणांना प्रेरणा देणारा ठरत आहे.

युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या भगतसिंह यांच्या खासगी जीवनाबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे, भगत सिंह हे २३ वर्षांचे होते, तेव्हा त्यांना फाशी देण्यात आली होती, भगत सिंह यांच्या एका छोट्याशा जीवनात अनेक मोठ्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. या माध्यमातून जास्तच जास्त तरूणांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

१) आज शहीद भगतसिंह यांचा जन्मदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यात भगतसिंह यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि प्रेरणादायी आहे. भगतसिंह यांचा तेजस्वी इतिहास तरूणांना प्रेरणा देणारा ठरत आहे. युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या भगतसिंह यांच्या खासगी जीवनाबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे, भगत सिंह हे २३ वर्षांचे होते, तेव्हा त्यांना फाशी देण्यात आली होती, भगत सिंह यांच्या एका छोट्याशा जीवनात अनेक मोठ्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. या माध्यमातून जास्तच जास्त तरूणांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.